सायगावसह परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 04:22 IST2021-09-10T04:22:41+5:302021-09-10T04:22:41+5:30

पावसाळ्याच्या मध्यात पिके एकदम जोमदार होती. १०० टक्के येणारे पीक आता तर पूर्णत: नष्ट झाली आहेत. एकीकडे सर्वसाधारण शेतकरी ...

Demand for declaration of wet drought in Saigaon area | सायगावसह परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

सायगावसह परिसरात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

पावसाळ्याच्या मध्यात पिके एकदम जोमदार होती. १०० टक्के येणारे पीक आता तर पूर्णत: नष्ट झाली आहेत. एकीकडे सर्वसाधारण शेतकरी पूर्णत: खचला असून, शासनाने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

भरपाई लवकरात लवकर देण्याची मागणी

गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे शेतकरी पूर्ण त्रस्त झाला होता व काहीअंशी कोरोनाचे वातावरण हळूहळू निवळताना दिसत होते. त्यामुळे शेतकरी जोमाने आपल्या शेती व्यवसायात मग्न झाला होता. बऱ्याच शेतकऱ्यांनी कपाशी व इतर पिकांची लागवडदेखील केली होती. पिके ही दमदार होती, त्यामुळे शेतकऱ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला होता. पण मंगळवार रात्र शेतकऱ्यांसाठी काळरात्र ठरली आणि मन्याड धरणाने रौद्ररूप धारण केले.

क्षणार्धात संपूर्ण शेतीची वाट लागली. सलग ४ ते ५ दिवस जोरदार पावसाने हजेरी लावली आणि शेतकरी तेथेच खचला आता येणारे १०० टक्के पीक २५ टक्के येणार की नाही, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. शासनाने पंचनामे करण्याचे आदेश दिल्याने तलाठी गणेश गढरी, कृषी सहाय्यक एस. एस. दांडगे, ग्रामसेवक तिरमली कोतवाल, सागर पाटील व इतर पदाधिकाऱ्यांनी पंचनामे करायलादेखील सुरुवात केली आहे. आता फक्त शेतकऱ्यांची नजर नुकसानभरपाई केव्हा मिळेल याकडे आहे.

या पावसामुळे रवींद्र पाटील, बाळासाहेब पाटील, नलिंद्र पाटील, भाऊसाहेब पाटील, बाळकृष्ण पाटील, चंद्रकांत पाटील, रामभाऊ पाटील, बाळासाहेब पाटील, सीताराम पाटील, हरिदास पाटील, सुरेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील व अशा बऱ्याच शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

Web Title: Demand for declaration of wet drought in Saigaon area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.