२९२८ आशांमार्फत जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला सुरूवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:27 IST2021-03-04T04:27:46+5:302021-03-04T04:27:46+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : बालकांमधील रक्ताक्षय तसेच कृमी दोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी सोमवारपासून जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला सुरूवात ...

Delivery of deworming pills through 2928 hopes | २९२८ आशांमार्फत जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला सुरूवात

२९२८ आशांमार्फत जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला सुरूवात

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : बालकांमधील रक्ताक्षय तसेच कृमी दोषाचे प्रमाण कमी करण्यासाठी सोमवारपासून जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला सुरूवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मास्क व सॅनिटायझरचा वापर करून जिल्हाभरातील २ हजार ९२८ आशा सेविकांमार्फ त घरोघरी जावून गोळ्या वाटप करण्यात येत आहे.

१ मार्च हा दिवस राष्ट्रीय जंतनाशक दिवस म्हणून संपूर्ण देशासह राज्यात साजरा केला जातो. याचे औचित्य साधून जिल्हा आरोग्य विभागातर्फे जिल्हाभरातील १ ते १९ वयोगटातील सर्व मुलांना गोळ्यांचे वाटप केले जाते. देशात १ ते १४ वयोगटातील जवळपास ६८ टक्के मुले असून त्यातील २८ टक्के मुलांना कृमी दोष आहे.मातीतून प्रसारीत होणा-या कृमी दोषाचे प्रमाण २९ टक्के आहे. तसेच ५ वर्षाखालील मुला, मुलींमध्ये ७० टक्के रक्तक्षयाचे प्रमाण आढळते तर ५ वर्षाखालील कुपोषणामुळे वाढ खुंटलेल्या बालकांची टक्केवारी ३४.४ टक्के आहे. १५ ते १९ वर्ष वयोगटातील ५६ टक्के किशोरवयीन मुलींमध्ये व ३० टक्के किशोरवयीन मुलांमध्ये रक्तक्षय आढळतो. त्यामुळे या दोषांचे प्रमाण कमी करण्यासाठी जळगाव जिल्ह्यात सोमवारपासून जंतनाशक गोळ्या वाटप मोहिमेला सुरूवात झाली आहे़ जिल्ह्यातील ११ लाख १७ हजार ८५० लाथार्थींना ह्या गोळ्या वाटप केल्या जातील.

२९२८ कर्मचा-यांची फौज

जळगाव जिल्ह्यात ३ हजार ९५० अंगणवाडी असून २९२८ आशा सेविकांमार्फत घरोघरी जावून जंतनाशक गोळ्यांचे वाटप केले जाणार आहे. दरम्यान, आशा सेविकांची कोविड टेस्टही केली जात आहे. जंतनाशक गोळी वाटप केल्यानंतर ती आशा सेविकांसमोरच मुलांना घ्यायच्या आहेत.

घरोघरी जाऊन वाटप

लाथार्थींच्या घरोघरी जाऊन जंतनाशक गोळ्या वाटप केल्या जातील. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सेविकांना मास्क व सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. पायीच फिरून सेविकांना गोळ्या वाटप करावयाच्या आहेत.

असा आहे औषधांचा मात्रा

१ ते २ वर्ष - अर्धी गोळी (अल्बेंडाझोल २०० मिग़्रॅ) (पावडर करून व पाण्यात विरघळून घेणे)

२ ते ३ वर्ष - एक गोळी (४०० मिग़्रॅ) (पावडर करून व पाण्यात विरघळून घेणे)

३ ते ६ वर्ष - एक गोळी (४०० मिग़्रॅ), चावून खाण्यास लावणे

६ ते १९ वर्ष - एक गोळी (४०० मिग़्रॅ) चावून खाण्यास लावणे

- ग्रामीण क्षेत्रातील लाभार्थी

८ लाख ३६ हजार २९४

- शहरी क्षेत्रातील लाभार्थी

२ लाख ८१ हजार ५५६

- मनपा क्षेत्रातील लाभार्थी

१ लाख ५० हजार

- एकूण लाभार्थी

११ लाख १७ हजार ८५०

Web Title: Delivery of deworming pills through 2928 hopes

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.