विशेष पथकांद्वारे पाड्यांवर उपाययोजना पोहोचवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2021 04:19 IST2021-08-23T04:19:16+5:302021-08-23T04:19:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोनाकाळात जिल्हाभरात कुपोषित बालकांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून दुर्गम ...

Deliver solutions to padas by special teams | विशेष पथकांद्वारे पाड्यांवर उपाययोजना पोहोचवा

विशेष पथकांद्वारे पाड्यांवर उपाययोजना पोहोचवा

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोनाकाळात जिल्हाभरात कुपोषित बालकांचे प्रमाण तिपटीने वाढले आहे. ही बाब अत्यंत गंभीर असून दुर्गम पाड्यावर आता विशेष पथक नेमून त्यांच्याद्वारे उपाययोजना पोहोचविण्यात याव्यात, अशी मागणी राष्ट्रवादीच्या युवती काँग्रेस उत्तर महाराष्ट्र समन्वयक दिव्या भोसले यांनी केली आहे. त्यांनी याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांना निवेदन दिले आहे.

जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या कुपोषणानंतर तीव्र कुपोषित बालकांची संख्या ही १३०० वर पोहोचल्याचे समोर आले होते. वाड्या, वस्त्या दुर्गम भागात हा वाढता आलेख आहे. तरीही २६ मिनी अंगणवाडी प्रस्ताव शासनस्तरावर पडून असून याचा पाठपुरावा होणे गरजेचे आहे. दुर्गम पाड्यांवर निष्पाप बालकांचा मृत्यू होत आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने बघावे व तातडीने उपाययोजना पोहोचवाव्यात असे दिव्या भोसले यांनी म्हटले आहे.

Web Title: Deliver solutions to padas by special teams