नात्याला काळिमा...आत्येभावानेच केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:15+5:302021-09-17T04:22:15+5:30
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात मे ते जून २०२१ या दरम्यान (तारीख निश्चित ...

नात्याला काळिमा...आत्येभावानेच केला १४ वर्षीय मुलीवर अत्याचार
या घटनेबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील एका गावात मे ते जून २०२१ या दरम्यान (तारीख निश्चित नाही) एके दिवशी पीडितेचे आई, वडील शेतात गेलेले असताना गावातच राहणारा पीडितेचा आतेभाऊ दुपारी घरी आला. तोंडाला रुमाल व साडीने हातपाय बांधून त्याने पीडितेवर अत्याचार केला. या घटनेची कुठे वाच्यता केली तर मारुन टाकण्याची धमकी दिली. त्यामुळे पीडितेने भीतीपोटी कोणालाच सांगितले नाही. आता गेल्या आठ दिवसांपासून उलट्यांचा त्रास होत असल्याने गुरुवारी आईने जिल्हा रुग्णालयात मुलीला उपचारासाठी आणले असता ती गर्भवती असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. हे ऐकून आईला जबर धक्का बसला. याबाबत तिला आईने विश्वासात घेऊन विचारणा केली असता मुलीने झाल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेनंतर महिलेने पती व मुलीला घेऊन एमआयडीसी पोलीस ठाणे गाठून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेता तक्रारीची वाच्यता न होऊ देता तातडीने संशयिताच्या अटकेसाठी पथक रवाना केले. म्हसावद दूरक्षेत्राचे हवालदार बळीराम सपकाळे, स्वप्नील, पाटील, प्रदीप पाटील, हेमंत पाटील व होमगार्ड नितीन चिंचोरे यांच्या पथकाने त्याला सायंकाळी एका गावातून ताब्यात घेतले. रात्री आठ वाजता त्याला अटक करण्यात आली. पीडितेच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे.