चाळीसगावात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 18:47 IST2018-04-21T18:47:54+5:302018-04-21T18:47:54+5:30
राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरिण ठार झाल्याची घटना २० रोजी रात्री ९ वाजता घडली.

चाळीसगावात वाहनाच्या धडकेत हरिणाचा मृत्यू
ठळक मुद्देराष्ट्रीय महामार्गावरील वळण रस्त्यावर झाला अपघातअपघातात हरिणासह पाडसाचा झाला मृत्यूचारा व पाण्याच्या शोधासाठी बिलाखेड शिवारात हरिण येतात रस्त्यावर
आॅनलाईन लोकमत
चाळीसगाव, दि.२१ : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २११ च्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत हरिण ठार झाल्याची घटना २० रोजी रात्री ९ वाजता घडली.
या अपघातात हरणासह तिच्या पोटातील पाडसाचाही मृत्यू झाला. बिलाखेड शिवारात मोठ्या प्रमाणात हरणांचे कळप आहेत. उन्हाळ्यात पाणी आणि चाऱ्याच्या शोधासाठी हरिण नेहमीच रस्त्यावर येत असल्याने अपघात होत असतात. वनविभागाने याकडे लक्ष केंद्रीत करावे अशी मागणी वन्यपे्रमींकडून होत आहे.