दीपनगरात पाईपलाईनला गळतीने पाण्याची नासाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 16:48 IST2020-03-07T16:48:20+5:302020-03-07T16:48:26+5:30
दखल घेण्याची मागणी

दीपनगरात पाईपलाईनला गळतीने पाण्याची नासाडी
दीपनगर, ता. भुसावळ : वीज निर्मिती केंद्राच्या ५०० मेगावॅट प्रकल्पाच्या आवारात पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने लाखो लिटर शुद्ध पाण्याची नासाडी होत आहे.
याबाबत सुरक्षारक्षकांनी तक्रार देऊन देखील पाईपलाईनची जोडणी होत नसल्यामुळे डबक्यांमध्ये पाणी साचत असून डासांची उत्पत्ती वाढत आहे. गेटमधून राखेच्या बल्करांची मोठ्या प्रमाणात या रस्त्याने वाहतूक होत असते. त्यामुळे डबक्यातील पाणी येणाऱ्या जाणाऱ्यांच्या अंगावर उडत असल्याने बल्कर चालकांमध्ये व पायी चालणारे तसेच दुचाकी धारकांमध्ये वाद होत असतात. वादाचे प्रमाण हाणामारीत देखील होत असते. याची संबंधित अधिकाºयांनी दखल घ्यावी अशी मागणी परिसरातून होत आहे.
कामगारांचे आरोग्य धोक्यात
गेल्या पाच-सहा दिवसांपासून पिण्याच्या पाईपलाईनला गळती लागल्याने डबके साचले असून पाईपलाईनमध्ये दुषित पाण्याचा शिरकाव होत असल्याने कामगारांचे आरोग्य धोक्यात आले आहे
प्रशासनाचे दुर्लक्ष
वारंवार सुरक्षा रक्षकांनी तक्रार देऊन देखील सिविल मेंटेनन्स चे कर्मचारी-अधिकारी फक्त बघ्याची भूमिका घेतात असल्याने गळतीकडे होणाºया दुर्लक्षाबाबत दखल घ्यावी, अशी मागणी होत आहे.