केºहाळे येथे स्वर्गरथाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 15:02 IST2020-09-20T15:00:33+5:302020-09-20T15:02:50+5:30
सरपंच राहुल पाटील यांनी स्वर्गरथ स्वखर्चाने तयार करून गावाला लोकार्पण केल्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

केºहाळे येथे स्वर्गरथाचे लोकार्पण
ठळक मुद्देसरपंच राहुल पाटील यांचे औदार्यग्रामस्थांना पडणार उपयोगी
केºहाळे, ता.रावेर : येथील सरपंच राहुल पाटील यांनी लोकोपयोगी येणारा स्वर्गरथ स्वखर्चाने तयार करून गावाला लोकार्पण केल्याने एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.
मृत्यूनंतरची वाटदेखील सुकर व्हावी, मृत शरीराला खांदा देऊन स्मशान घाटापर्यंत होणारा प्रवास करण्यासाठी सोयीचे व्हावे याकरिता सामाजिक जाण व समाजाचे काहीतरी ऋण फेडावे या उदात्त हेतूने त्यांच्या आजी सीताबाई किसन पाटील यांच्या स्मरणार्थ स्वर्गरथाचे लोकार्पण सोहळा ग्रामस्थांच्या उपस्थितीत करण्यात आला.