चिनावल येथे स्वर्ग रथाचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2021 04:20 IST2021-08-20T04:20:28+5:302021-08-20T04:20:28+5:30
चिनावल, ता. रावेर : भूषण लक्ष्मण भंगाळे यांच्या स्मरणार्थ येथील लेवा पंच कमिटीत १८ रोजी स्वर्गरथाचे लोकार्पण ...

चिनावल येथे स्वर्ग रथाचे लोकार्पण
चिनावल, ता. रावेर : भूषण लक्ष्मण भंगाळे यांच्या स्मरणार्थ येथील लेवा पंच कमिटीत १८ रोजी स्वर्गरथाचे लोकार्पण करण्यात आले.
येथील गाव दरवाजावर या स्वर्गरथाचे लेवा पंचकमिटीचे सदस्य कल्पेश नेमाडे, वंदना नेमाडे तसेच माजी सरपंच योगेश बोरोले व सरपंच भावना बोरोले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले.
यावेळी दिवंगत भूषण भंगाळे यांचे वडील लक्ष्मण भंगाळे तसेच लेवा पंच कमिटीचे अध्यक्ष सोनजी नेमाडे, पोलीसपाटील नीलेश नेमाडे, योगेश बोरोले, गोपाळ पाटील, गोपाळ नेमाडे, संजीव महाजन, घनश्याम पाटील, श्रीकांत सरोदे, सागर भारंबे, संदीप टोके, पोपट भारंबे, नारायण कोल्हे, मनोहर नारखेडे, गोटू नेमाडे, दीपक बोरोले, नीलेश गारसे, जीवन बोरोले, भास्कर सरोदे, अतुल धांडे, बन्सी गारसे, चुडामण गारसे यांच्यासह गावातील सर्व स्तरीय पदाधिकारी उपस्थित होते.