मातोश्री आनंदाश्रममध्ये ओपन जिमचे लोकार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:13 IST2021-07-02T04:13:00+5:302021-07-02T04:13:00+5:30
जळगाव : जिल्हा नियोजन व विकास निधीतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ओपन जिम साहित्य मातोश्री आनंदाश्रमात प्राप्त झाले होते. तसेच ...

मातोश्री आनंदाश्रममध्ये ओपन जिमचे लोकार्पण
जळगाव : जिल्हा नियोजन व विकास निधीतून नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत ओपन जिम साहित्य मातोश्री आनंदाश्रमात प्राप्त झाले होते. तसेच जिल्हा नियोजन व विकास निधीतून स्वतंत्र ट्रान्सफॉर्मरदेखील प्राप्त झाले असून त्याचा लोकार्पण सोहळा नुकताच जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, केशवस्मृतीचे प्रतिष्ठानचे अध्यक्ष भरत अमळकर, उपाध्यक्ष नीलकंठ गायकवाड, सचिव रत्नाकर पाटील, प्रकल्प प्रमुख अनिता कांकरिया, सहप्रकल्प प्रमुख संजय काळे, जळगाव जनता बँकेचे अध्यक्ष अनिल राव, केशवस्मृतीचे सदस्य संजय बिर्ला, डॉ. प्रताप जाधव, दिलीप चोपडा, श्रीकांत वाणी, प्रवीण देशमुख उपस्थित होते.