केकी मुस प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:12 IST2021-01-01T04:12:11+5:302021-01-01T04:12:11+5:30

जळगाव : चाळीसगाव येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत कलामहर्षी केकी मूस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची अधिकृत वेबसाईट www.kekimoosfoundation.org चे लोकार्पण ...

Dedication of Keki Muse Foundation website | केकी मुस प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

केकी मुस प्रतिष्ठानच्या संकेतस्थळाचे लोकार्पण

जळगाव : चाळीसगाव येथील आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कलावंत कलामहर्षी केकी मूस ह्यांनी स्थापन केलेल्या संस्थेची अधिकृत वेबसाईट www.kekimoosfoundation.org चे लोकार्पण त्यांच्या पुण्यतिथीदिनी ३१ डिसेंबर रोजी चाळीगाव येथून खासदार उन्मेष पाटील यांच्या हस्ते तर जळगाव येथून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत ह्यांच्या हस्ते ऑनलाईन करण्यात आले.

या संकेत स्थळावरून संस्थेची इत्यंभूत माहिती लोकांना मिळणार आहे. तसेच केकी मूस ह्यांच्याबाबत व त्यांच्या कलाकृतीं विषयी सर्व माहिती दर्शकांना मिळणार आहे. जास्तीत जास्त नागरीकांनी संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन संस्थेच्या विश्वस्त मंडळातर्फे करण्यात आले आहे.

चाळीसगाव येथील कार्यक्रमात खासदार उन्मेष पाटील यांच्या कार्यालयात संस्थेच्यावतीने अध्यक्ष भि. अ. गायकवाड, सचिव कमलाकर सामंत,अनंत सामंत, भिकन वाणी, ग्रंथपाल मनोज घाटे आदी उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी कार्यालयात संस्थेच्यावतीने विश्वस्त आणि संग्रहालय तज्ज्ञ भुजंगराव बोबडे , मार्गदर्शक सुरेश पांडे, सुजीत वर्मा उपस्थित होते.

Web Title: Dedication of Keki Muse Foundation website