शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...
2
एकनाथ शिंदेंना दुखवायचे नसल्याने त्यांच्याशी युती केली; CM फडणवीसांनी सांगितली Inside Story
3
आजचे राशीभविष्य : गुरुवार ८ जानेवारी २०२६; या तीन राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी, मान व प्रतिष्ठा वाढेल
4
भाजप-काँग्रेस नगरसेवकांचा घरोबा; आधी अभद्र युती, नंतर डॅमेज कंट्रोल, अखेर कारवाई
5
“काँग्रेसचे खासदार बिनविरोध आले तेव्हा लोकशाही धोक्यात आली नाही का?”: CM देवेंद्र फडणवीस
6
अजित पवार ताणताहेत, भाजप सहन करतंय; पण का?; काका-पुतण्याच्या जोडीला मूकसंमती? 
7
देवेंद्र फडणवीस, राज ठाकरेंच्या सभांना उमेदवारांची सर्वाधिक मागणी; सभा, रोड शोंचा कल्ला सुरू
8
काही लोकांचा विकास नव्हे, तर खुर्ची हा एकच अजेंडा आहे; शिंदेंची ठाकरे बंधूंवर घणाघाती टीका
9
घडामोडींना वेग, काँग्रेसकडून कारवाईचा बडगा; आता अंबरनाथमधील ‘ते’ १२ नगरसेवक भाजपमध्ये येणार
10
विरोधी पक्षनेतेपद नाहीच, आता प्रतोदांचा मंत्रिपदाचा दर्जाही जाणार; सरकारची सदस्य संख्येची अट
11
डॉन अरुण गवळीच्या दोन्ही मुली करोडपती; प्रतिज्ञापत्रातून उमेदवारांच्या मालमत्तेची माहिती उघड
12
अधिकाऱ्यांवरील कारवाईचा चेंडू आयोगाच्या कोर्टात; ६ बिनविरोध उमेदवारांप्रकरणी अहवाल सादर
13
भारत देणार सर्वांना धक्का; वृद्धिदर ७.४ टक्के राहणार, सरकारने जाहीर केली आकडेवारी
14
शिंदेसेना उमेदवाराच्या पोटात चाकू खुपसला; वांद्रे येथे प्रचार करताना झाला जीवघेणा हल्ला
15
"आम्ही सगळ्या मुस्लिमांविरोधात नाही, पण जो..."; मंत्री नितेश राणेंनी दिली उघड धमकी
16
काळजाचा थरार! ११ वर्षीय शिवमनं बिबट्याच्या हल्ल्यातून ९ वर्षीय बहीण स्वरांजलीला वाचवले
17
वेदा‍ंता ग्रुपचे चेअरमन अनिल अग्रवाल यांचा मुलगा अग्निवेश अग्रवाल यांचं निधन
18
अमेरिका-रशियात तणाव वाढला! व्हेनेझुएलाहून जाणारा रशियन तेल टँकर US नौदलाने जप्त केला
19
उल्हासनगरातील गुंडाराज संपवून शहराचा चेहरामोहरा बदलणार; CM देवेंद्र फडणवीसांचा निशाणा कुणावर?
20
मतदानापूर्वीच मनसेत मोठा भूकंप होणार?; भाजपा-शिंदेसेना राज ठाकरेंना धक्का देण्याच्या तयारीत
Daily Top 2Weekly Top 5

जळगावच्या बाजारपेठेत मागणी घटल्याने धान्य, डाळींच्या भावात घसरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 11:55 IST

धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी

विजयकुमार सैतवाल

जळगावजळगावच्या बाजारपेठेमध्ये वर्षभराच्या धान्य खरेदीसाठी असलेली गर्दी कमी झाली असून गव्हाच्या आवक व मागणीही कमी झाल्याने भावात घसरण झाली आहे. वर्षभरासाठीच्या धान्य खरेदीसह डाळींचीही मागणी वाढल्यामुळे डाळीत तेजी सुरू होती, तीदेखील थांबली आहे. गेल्या दोन महिनाभरापासून गहू व डाळीमध्ये दर आठवड्याला तेजी येत असल्याने ग्राहकांची चिंता वाढली होती. दीड महिनाभरापूर्वी वाढलेल्या तांदळाचे भावदेखील तीन आठवड्यापासून स्थिर आहेत. त्यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.गेल्या वर्षी कमी पाऊस झाल्यामुळे खरीप हंगामावर मोठा परिणाम होऊन कडधान्याची आवक कमी झाली व त्याचा डाळीवर परिणाम झाला आणि सुरुवातीपासूनच डाळींचे भाव वाढू लागले. त्यात यंदाही पाऊस लांबणार असल्याचे चित्र असल्याने व मागणी वाढल्याने गेल्या दोन महिनाभरापासून धान्य, डाळींचे भाव वाढत होते. मात्र आता मागणी कमी झाल्याने गव्हाचे भावदेखील कमी होत असल्याची माहिती जळगाव दाणाबाजार असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण पगारिया यांनी दिली.गेल्या आठवड्यात ८१०० ते ८५०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या मुगाच्या डाळीचे भाव १०० रुपये प्रती क्विंटलने कमी होऊन ते ८००० ते ८४०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. उडीदाच्या डाळीच्या भावातही घसरण होऊन ५९०० ते ६३०० रुपये प्रती क्विंटलवरून ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटलवर आली आहे. अशाच प्रकारे गेल्या आठवड्यात ५८०० ते ६२०० रुपये प्रती क्विंटल असलेल्या हरभरा डाळीचे भाव या आठवड्यात ५६०० ते ६००० रुपये प्रती क्विंटलवर तर तसेच तूरडाळीच्या भावातदेखील १०० रुपये प्रती क्विंटलने घसरण होऊन ते ८३०० ते ८७०० रुपये प्रती क्विंटलवरून ८२०० ते ८६०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत.गव्हातही घरसणवर्षभरासाठी धान्य खरेदी थांबल्याने गव्हाचे भाव कमी झाले आहेत. १४७ गव्हाचे भाव २३५० ते २४५० वरून २३०० ते २३५० रुपये प्रती क्विंटल, लोकवन गव्हाचे भावदेखील २३०० ते २४०० रुपयांवरून २२५० ते २३५० रुपये प्रती क्विंटल तर चंदोसीचे भाव ३८०० ते ३९०० वरून ३७०० ते ३८०० रुपये प्रती क्विंटलवर आले आहेत. या सोबतच शरबती गव्हाचे भाव २४५० ते २५०० रुपये प्रती क्विंटलवरून २४०० ते २४५० रुपये प्रती क्विंटल आले आहेत. बाजारपेठेत जळगाव जिल्ह्यासह मध्यप्रदेश व राजस्थानातून येणाऱ्या गव्हाची आवकही थांबली आहे.तांदुळाचे भाव स्थिरतांदुळाची आवक नसल्याने व मागणी कायम असल्याने दोन महिन्यांपूर्वी तांदळाच्या भावातही वाढ झाली होती. मात्र महिनाभरापासून हे भाव स्थिर आहे. यात चिनोर ३२०० ते ३६०० रुपये प्रती क्विंटल, सुगंधी कालीमूछ ४२०० ते ४५०० रुपये प्रती क्विंटल, वाडा कोलम ४८०० ते ५००० रुपये प्रती क्विंटल, मसुरी २७०० ते २८०० रुपये प्रती क्विंटल आणि बासमती ९००० ते १ हजार २०० रुपये प्रती क्विंटलवर स्थिर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

टॅग्स :Jalgaonजळगाव