मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2021 05:49 PM2021-10-10T17:49:54+5:302021-10-10T17:50:21+5:30

सर्व शक्ती सेनेची मागणी : श्रीनगरातील घटनेचा नोंदविला निषेध

Declare help to the families of deceased teachers | मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करा

मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करा

Next


जळगाव : श्रीनगर येथील एका शाळेतील शिक्षकांची दहशतवाद्यांनी गोळ्या मारून हत्या केली. या घटनेचा निषेध व्यक्त करीत मृतांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करण्यात यावी व दहशतवाद्यांवर तत्काळ कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व शक्ती सेनातर्फे अपर जिल्हाधिकारी प्रवीण महाजन यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. निवेदन देताना सर्व शक्ती सेना राज्याध्यक्ष प्रा. संजय मोरे, विद्यार्थी संघटना जिल्हाध्यक्ष कृष्णा सावळे, दीपक चौधरी, विजय तायडे, धनराज कोळी, गजानन काडेले, सतीश गाढे, नितीन गवई, दीपक वानखेडे, राजेंद्र सपकाळे, युवराज कोळी, सचिन सुरवाडे, कैलास दामोदरे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Declare help to the families of deceased teachers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app