लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : कोविडच्या संकटात सेवा देणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेत कायम करण्यात यावे, या मागणीसाठी लढा उभारण्याचा निर्णय विविध संघटनांच्या बैठकीत घेण्यात आला. यात मंगळवारी १४ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अजिंठा विश्रामगृहात रविवारी ही बैठक पार पडली.
कोविडच्या काळात शासकीय रुग्णालयात कंत्राटी पद्धतीने डॉक्टर, परिचारिका, कक्षसेवक, डाटा एंट्री ऑपरेटर, सुरक्षा रक्षक यांनी जिवाची पर्वा न करता सेवा दिली आहे. मात्र, कोरोना कमी झाल्यानंतर यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. त्यामुळे अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्या पार्श्वभूमीवर विविध संघटनांची बैठक घेण्यात आली. यावेळी महाराष्ट्र जनक्रांती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष मुकुंद सपकाळे, छावा मराठा युवा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अमोल कोल्हे, हरिश्चंद्र सोनवणे, एच. एच. चव्हाण, प्रहार जनशक्ती पक्षाचे युवक महानगराध्यक्ष नीलेश बोरा, चंदन बिऱ्हाडे, भारत सोनवणे, सुधाकर पाटील, सतीश सुर्वे, कोमल बिऱ्हाडे, प्रिया वाघ, अक्षय जगताप, बापूसाहेब पाटील, कुवरसिंग पावरा, युवराज सुरवाडे, भाग्यश्री चौधरी, प्रतीक्षा सोनवणे, शिला सपकाळे, दीपाली भालेराव, ऐश्र्वर्या सपकाळे, मंदाकिनी विंचूरकर, मो. आमिर शेख, निशा तापकिरे, जयवंत मराठे, जितेंद्र चौधरी, कृष्णा सावळे, सुनील परदेशी, डॉ. प्रसन्न पाटील, गणेश सोनवणे, नदीम बेग, दानिश बागवान, पवन पाटील, मनोज सावकारे, चंद्रशेखर पाटील, समाधान शिंगटे, प्रशांत नेवे, किशोर भोई, आदी उपस्थित होते.