मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे आढळला शिरच्छेद केलेला मृतदेह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2019 12:31 IST2019-11-29T12:31:07+5:302019-11-29T12:31:39+5:30

पोलीस दाखल

The deceased body was found at Changdev in Muktinagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे आढळला शिरच्छेद केलेला मृतदेह

मुक्ताईनगर तालुक्यातील चांगदेव येथे आढळला शिरच्छेद केलेला मृतदेह

मुक्ताईनगर, जि. जळगाव : तालुक्यातील चांगदेव येथे मजुरीकामासाठी वास्तव्यास आलेल्या ५५ वर्षीय इसमाचा शेती शिवारात शिरच्छेद करून निर्घृणपणे खून केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. भिका दयाराम पाटील असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. विनायक बाजीराव पाटील यांच्या कासारखेड शिवारातील शेतात मृतदेह मिळून आले आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत.
मूळ जुनोना ता.भुसावळ येथील रहिवासी असलेल्या भिका दयाराम पाटील हा इसम गेल्या दीड दोन वर्षांपूर्वी चांगदेव येथे मोलमजुरी कामासाठी आला होता. वल्लभ नगर भागात राधाबाई चौधरी यांच्या घरात पत्नी मुलांसोबत तो राहत होता. सदर इसमाची निर्घृणपणे हत्त्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. विनायक बाजीराव पाटील राहणार चांगदेव यांच्या कासारखेडा शिवारातील केळी बागेच्या शेतात भिका पाटील यांचा मृतदेह दिसून आला. खून करणाऱ्या अज्ञातांनी भिका पाटील यांचे पाय बांधले होते तर शिरच्छेद करून धडा पासून मुंडके ३ फूट अंतरावर फेकले होते.
इतक्या निर्घृणपणे हत्त्या करण्या मागचे कारण काय असावे या बाबत तर्क वितर्क व्यक्त केले जात आहे.

Web Title: The deceased body was found at Changdev in Muktinagar taluka

टॅग्स :Jalgaonजळगाव