करंजी बुद्रूक येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 16:14 IST2018-08-21T16:14:04+5:302018-08-21T16:14:37+5:30
पारोळा तालुक्यात स्वत:च्या शेतातच घेतले विष

करंजी बुद्रूक येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
पारोळा, जि.जळगाव : तालुक्यातील करंजी बुद्रूक येथील भैया सुरेश महाजन (३३) या तरुण शेतकºयाने कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात विष प्राशन केले होते. उपचार घेत असताना त्यांचा मृत्यू झाला.
भैया सुरेश महाजन यांनी १६ रोजी त्यांच्या शेतातच काहीतरी विषारी पदार्थ सेवन केला होता. बेशुद्धावस्थेत ते रात्रभर शेतात पडून होते. सकाळी घरच्यांनी शोध घेतल्यावर गंभीर अवस्थेत शेतात सापडल.
पारोळा येथे प्रथमोपचार करून धुळे जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवले होते. तेथे उपचारादरम्यान दुसºया दिवशी सायंकाळी सहा वाजता त्यांचा मृत्यू झाला.
त्यांच्याकडे गट न ११३/३ मध्ये १ हेक्टर २९ आर जमीन आहे. त्यांच्यावर सोसायटीचे ५१ हजार ६०० रुपये तसेच इतर कर्ज होते. यास कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.
त्यांच्यावर करंजी बुद्रूक येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई, वडील, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ असा परिवार आहे.