बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2020 15:28 IST2020-07-08T15:27:44+5:302020-07-08T15:28:00+5:30
साळशिंगी येथील उमेश प्रल्हाद चौधरी (वय ३५) या कर्जबाजारी शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली.

बोदवड तालुक्यातील साळशिंगी येथील कर्जबाजारी शेतकऱ्याची आत्महत्या
बोदवड, जि.जळगाव : तालुक्यातील साळशिंगी येथील उमेश प्रल्हाद चौधरी (वय ३५) या कर्जबाजारी शेतकºयाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.
ते गेल्या दोन दिवसांपासून शेतात जाऊन येतो, असे सांगून घरून निघाले होते. घरी परतले नव्हते. त्यांच्या शेतातील विहिरीजवळून एक जण जात असताना एक मृतदेह विहिरीत तरंगताना आढळला. मृतदेह वर काढला असता तो उमेश पाटील यांचा असल्याचे दिसले. त्यांच्यावर २००२ पासून खासगी कर्ज होते. सोसायटी मिळाली नसल्याने पुन्हा खासगी कर्ज काढून शेत पेरले. परंतु पावसाने डोळे वटारल्याने दुबार पेरणीसाठी कोण कर्ज देईल या विवंचनेत ते होते, अशी माहिती कुटुंबियांनी दिली.
त्यांच्या पश्चात पत्नी, पाच वर्ष व दोन वर्षांची मुले आहेत.