कुंभारी तांड्यातील युवकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 20:30 IST2020-06-02T20:30:18+5:302020-06-02T20:30:55+5:30

एकाविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा

Death of a young man from Kumbhari Tanda | कुंभारी तांड्यातील युवकाचा मृत्यू

कुंभारी तांड्यातील युवकाचा मृत्यू


पहूर, ता. जामनेर: कुंभारी तांडा, ता. जामनेर येथे सोमवारी युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी पहूर पोलीसात मंगळवारी पोपट उर्फ पिंट्या सोना चव्हाण याच्या विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोपटला अटक करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कुंभारी तांडा येथे सोमवारी दीपक भागचंद चव्हाण याने गाडीचा हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून पोपट उर्फ पिंट्या सोना चव्हाण याने मारहाण केल्याची घटना घडली होती. यात दीपक याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जामनेर उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. मात्र दीपकचा मृत्यू झाला होता. दीपकचा चुलत भाऊ विनोद देवचंद राठोड याने दिलेल्या फिर्यादीवरून पोपट सोना चव्हाण याच्याविरूद्ध सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक अमोल देवडे करीत आहे.

Web Title: Death of a young man from Kumbhari Tanda