गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2019 16:33 IST2019-09-13T16:33:22+5:302019-09-13T16:33:27+5:30
दिनेश हा औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता. गणपती विसर्जनासाठी तो एरंडोल येथे आपल्या गावी आलेला होता.

गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचताना युवकाचा मृत्यू
एरंडोल- येथे गणपती विसर्जन मिरवणुकीत नाचत असताना अचानक चक्कर येऊन खाली पडल्याने दिनेश विनोद बोरसे (वय २०) या तरुणाचा दुपारी बारा वाजेच्या सुमारास मृत्यु झाला. दिनेश हा गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत ढोल ताशाच्या तालावर ठेका घेत असतांना हृदय विकाराचा झटका आल्याने त्याचा मृत्यु झाला, असे एरंडोल पोलीस स्टेशन सूत्रांनी सांगितले.
दिनेश हा औरंगाबाद येथे खाजगी कंपनीत नोकरीला होता. गणपती विसर्जनासाठी तो एरंडोल येथे आपल्या गावी आलेला होता. या घटनेमुळे गणेश भक्त व नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी एरंडोल पो.स्टे.ला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. हेड कॉन्स्टेबल भीमराव मोरे, अशोक मोरे, सुनिल लोहार, निलेश ब्राह्मणे हे तपास करीत आहे.