पहूर, जि. जळगाव : कपडे धुण्यासाठी नदीवर गेलेल्या भावजयीसोबत असलेल्या रिजवाना कलीम तडवी (१०) व सुहाना कलीम तडवी (४) या दोन सख्ख्या बहिणींचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. ही ह्रदयद्रावक घटना शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. या बाबत कोठेच चर्चा नव्हती, मात्र शनिवारी सकाळी ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली.मिळालेल्या माहितीनुसार, रिजावाना व सुहाना या दोघींची भावजयी शुक्रवारी दुपारी गावालगत असलेल्या वाघूर नदीच्या कट्ट्यावर धुणे धुण्यासाठी गेली होती. त्या वेळी भावजयी पाठोपाठ या दोन्ही मुलीली तेथे गेल्या. त्या वेळी सुहानाचा पाय घसरून ती पाण्यात पडली. तिला पकडण्यासाठी रिजवानाही पुढे गेली असता दोन्हीही पाण्यात बुडाल्या. भावजयीने आरडाओरड केली त्यावेळी काही जणांनी तेथे धाव घेतली व मुलींना बाहेर काढले, मात्र तो पर्यंत दोघी गतप्राण झाल्या होत्या.
पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 13:09 IST
गावात हळहळ
पाण्यात बुडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू, जामनेर तालुक्यातील पिंपळगाव बुद्रुक येथे
ठळक मुद्देभावजयीने केली आरडाओरडशनिवारी सकाळी ही घटना सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली