दगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2018 12:59 PM2018-10-19T12:59:03+5:302018-10-19T12:59:16+5:30

खाजगी रुग्णालयात सुरू होते उपचार

Death of a teenager who was seriously injured | दगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

दगडफेकीत जखमी झालेल्या तरुणाचा मृत्यू

Next

जळगाव : मंगळवारी रात्री शहरातील तांबापुरा भागात झालेल्या दगडफेकीत जखमी झालेल्या नीलेश भाऊराव सपकाळ (३५, रा. हरिविठ्ठल नगर) या पादचारी तरुणाचा शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
शहरातील तांबापुरा भागात दोन गटात किरकोळ कारणावरून दगडफेक झाल्याची घटना मंगळवारी रात्री १०़३० वाजेच्या सुमारास घडली होती. या दगडफेकीत रस्त्यावरून जात असलेला नीलेश सपकाळ हा तरूण जखमी झाला होता. त्याच्यावर जिल्हा रूग्णालय व नंतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते.
तांबापुरातील श्यामा फायर कॉम्प्लेक्सजवळ दहा ते बारा तरूण बसलेले होते़ यावेळी त्या तरूणांमध्ये आपआपसात काही कारणामुळे वाद होऊन दगडफेकीला सुरूवात झाली होती.

Web Title: Death of a teenager who was seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.