निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2021 04:17 IST2021-05-13T04:17:15+5:302021-05-13T04:17:15+5:30

ममुराबाद : साहेबराव पाटील (वय ६५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, मुलगा व सून असा परिवार ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

ममुराबाद : साहेबराव पाटील (वय ६५) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन भाऊ, मुलगा व सून असा परिवार आहे. रमेश पाटील यांचे ते लहान बंधू होत.

---

रामदेव पंडित

जळगाव : रामदेव पंडित यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, दोन मुले, पाच भाऊ, बहीण, सून नातवंडे असा परिवार आहे.

--

जितेंद्र येवले

जळगाव : जितेंद्र येवले (वय ३४, रा. मारोतीपेठ) यांचे मंगळवारी पुणे येथे अल्पशा आजाराने निधन झाले.

---

बालू प्रजापती

जळगाव : बालू प्रजापती (वय ८९, रा. जिजाऊ नगर, वाघनगर) यांचे मंगळवारी सकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुलगे, चार मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील कर्मचारी सुभाष प्रजापती यांचे ते वडील होत.

---

सुभद्राबाई ठाकूर

जळगाव : सुभद्राबाई ठाकूर (वय ७८, रा. पिंप्राळा) यांचे मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुलगे, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे. ते राजेंद्र ठाकूर यांच्या त्या आई होत.

---

रवींद्र खेडकर

जळगाव : सामान्य रुग्णालय येथील सेवानिवृत्त कर्मचारी रवींद्र खेडकर (वय ६५) यांचे अल्पशा आजाराने मंगळवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सुना, नातवंडे, भाऊ, बहीण असा परिवार आहे. ते रितेश खेडकर यांचे वडील होत.

---

हुंदराज पोपटानी

जळगाव : हुंदराज पोपटानी (वय ५९, रा. मेहरुण लेक) यांचे बुधवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज, गुरुवारी सकाळी ९.३० वाजता निघणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुले असा परिवार आहे.

--

विजय पाटील

जळगाव : विजय पाटील (वय ४५, रा. दांडेकरनगर, पिंप्राळा) यांचे मंगळवारी

निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. मनपा अभियंता अरुण पाटील यांचे ते बंधू होत.

---

Web Title: Death talk