निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:14 IST2021-04-12T04:14:52+5:302021-04-12T04:14:52+5:30

जळगाव : माजी कर सल्लागार शशिशेखर नारायण दप्तरी (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : माजी कर सल्लागार शशिशेखर नारायण दप्तरी (वय ७०) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, सून, मुलगी, नातवंडे असा परिवार आहे. ते सी.ए. प्रकाश दप्तरी यांचे लहान बंधू होत.

संभाजी देशमुख

जळगाव : भाजपचे कार्यकर्ता संभाजी देशमुख यांचे नुकतेच निधन झाले.

सुरेश फुसे (बारी)

जळगाव : सुरेश फुसे (बारी) (वय ७८, रा. शिरसोली) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते प्रकाश फुसे यांचे वडील होत.

नाना पाटील,

जळगाव : नाना पाटील (वय ५१, रा. भादली) यांचे ११ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, चार भाऊ, एक मुलगा, दोन मुली, सून व नातवंडे असा परिवार आहे. ते स्वामी समर्थ शैक्षणिक मंडळाचे चेअरमन मनोज पाटील यांचे मोठे भाऊ होत.

रघुनाथ श्रीखंडे

जळगाव : रघुनाथ श्रीखंडे (८६, रा. कोठारीनगर, मूळ रा. चांगदेव, ता. मुक्ताईनगर) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या पश्चात चार मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते साहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किसन श्रीखंडे यांचे वडील होत.

सुधा फिरके

जळगाव : सुधा फिरके (वय ७०, रा. नागेश्वर कॉलनी) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुले, एक मुलगी व नातवंडे असा परिवार आहे. त्या महवितरणचे फैजपूर येथील उपकार्यकारी अभियंता राकेश फिरके यांच्या मातोश्री होत.

Web Title: Death talk