निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:17 IST2021-03-26T04:17:27+5:302021-03-26T04:17:27+5:30

जळगाव : निशिका जोशी (भोजणे) (१४, रा. जुनी जोशी कॉलनी) हिचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात आई, ...

Death talk | निधन वार्ता

निधन वार्ता

जळगाव : निशिका जोशी (भोजणे) (१४, रा. जुनी जोशी कॉलनी) हिचे सोमवारी अल्पशा आजाराने निधन झाले. तिच्या पश्चात आई, वडील, आजी, काका, काकू असा परिवार आहे. वृत्तपत्र विक्रेते चंद्रकांत जोशी यांची मुलगी व शशिकांत जोशी यांची ती पुतणी होत.

--

दीपक पाटील

जळगाव : दीपक पाटील (३५, रा. वडली) यांचे गुरुवारी दुपारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, आई, वडील, दोन भाऊ असा परिवार आहे.

--

आशाबाई चौधरी

जळगाव : आशाबाई चौधरी (५४, रा. रामेश्वर कॉलनी) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, तीन मुली, मुलगा, नातवंडे असा परिवार आहे. म.रा.औ.वि. महामंडळाचे सेवानिवृत्त कर्मचारी दिलीप चौधरी यांच्या त्या पत्नी होत.

--

सुशीलाबाई पाटील

जळगाव : सुशीलाबाई पाटील (८६) यांचे गुरुवारी सकाळी अल्पशा आजाराने निधन झाले. मु.जे. महाविद्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी जी.एस. पाटील यांच्या त्या आई होत.

--

कोंडीबा कोकाटे

जळगाव : दुर्गादेवी मंदिराचे उपासक कोंडीबा कोकाटे (८५, रा. बळीरामपेठ) यांचे मंगळवारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी आहे.

--

मोतीलाल बाविस्कर

जळगाव : मोतीलाल बाविस्कर (५८, रा. अष्टभुजा नगर, पिंप्राळा) यांचे अल्पशा आजाराने बुधवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, बहीण, भावंडे असा परिवार आहे. परीक्षित बाविस्कर यांचे ते वडील होत.

--

दिनकर सोनवणे

जळगाव : दिनकर सोनवणे (६३, रा. शनिपेठ, रिधुरवाडा) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

--

सुरेश पाटील

जळगाव : सुरेश पाटील (७०) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, सून, नातवंडे असा परिवार आहे.

--

मधुकर वाघ

जळगाव : मधुकर वाघ (भगत) (७७, रा. मेहरूण) यांचे हृदयविकाराने गुरुवारी सकाळी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा, सून, मुली, जावई, नातवंडे, भाऊ, बहीण असा आप्त परिवार आहे. ते मेहरूण येथे अक्षय तृतीयेच्या दिवशी बारागाड्या ओढण्याचे काम करीत.

--

प्रतापराय वेद

जळगाव : मे. प्रतापराय कांतीलाल फर्मचे मालक प्रतापराय वेद (रा. आदर्श नगर) यांचे गुरुवार, २५ मार्च रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. चेतन वेद यांचे ते वडील होत.

--

इंदूबाई पाटील

जळगाव : इंदूबाई पाटील (७३, रा. खेडी बु.) यांचे गुरुवारी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शुक्रवारी सकाळी ७.३० वा. निघणार आहे. त्यांच्या पश्चात मुलगा, सून, तीन मुली, नातवंडे असा परिवार आहे. धनराज पाटील यांचे ते वडील होत.

--

देवीदास मुळे

जळगाव : स्टेट बँकेतील सेवानिवृत्त कर्मचारी देवीदास मुळे (८४, रा. गजानन नगर) यांचे गुरुवारी पहाटे निधन झाले. त्यांच्या पश्चात तीन मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. प्रशांत वैद्य यांचे ते सासरे होत.

--

Web Title: Death talk