बोरखेडा येथे सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

By Admin | Updated: June 10, 2017 13:07 IST2017-06-10T13:07:52+5:302017-06-10T13:07:52+5:30

चूल पेटविण्यासाठी सरपण घेत असताना तिच्या हाताच्या बोटास विषारी सापाने चावा घेतला़

The death of a snake charmer at Borkheda | बोरखेडा येथे सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

बोरखेडा येथे सर्पदंशाने तरुणीचा मृत्यू

कु:हा (काकोडा), जि. जळगाव, दि. 10 - मुक्ताईनगर तालुक्यातील  बोरखेडा (जुने) येथील कविता कमलसिंग चव्हाण या 22 वर्षीय तरुणीचा विषारी सापाने दंश केल्याने  मृत्यू झाला़
बोरखेडा (जुने) येथील कविता चव्हाण ही तरुणी सकाळी चूल पेटविण्यासाठी सरपण घेत असताना तिच्या हाताच्या बोटास विषारी सापाने चावा घेतला़ ही बाब तरुणीच्या लक्षात येताच तिने वडिलांना सांगितले. तिला तत्काळ कु:हा येथील आरोग्य केंद्रात दाखल केले.  आरोग्याधिकारी डॉ.तोडसाम यांनी तिच्यावर प्रथमोपचार करून मुक्ताईनगरला रवाना केले. मुक्ताईनगर येथील उपजिल्हा रुग्णालयातून तिला जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात नेत असताना वाटेतच तिचा मृत्यू झाला. 
 

Web Title: The death of a snake charmer at Borkheda