निवृत्त शिक्षिकेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 29, 2017 01:28 IST2017-05-29T01:28:27+5:302017-05-29T01:28:27+5:30

निवृत्त शिक्षिका तबस्सुम जहाँ मोहंमद हनिफ खान (66) यांचा रविवारी सकाळी स्वाईन फ्लू आजाराने औरंगाबाद येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Death of a retired teacher swine flu | निवृत्त शिक्षिकेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

निवृत्त शिक्षिकेचा स्वाईन फ्लूने मृत्यू

जळगाव : शहरातील मेहरूण भागातील अक्सानगरातील रहिवासी व निवृत्त शिक्षिका तबस्सुम जहाँ मोहंमद हनिफ खान (66) यांचा रविवारी सकाळी स्वाईन फ्लू आजाराने औरंगाबाद येथे उपचारादरम्यान  मृत्यू झाला.
तबस्सुम खान यांना ताप आल्याने जळगावातीलच खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतरही त्यांचा आजार बरा होत नसल्याने त्यांना औरंगाबाद येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निदान झाले. 15 दिवसांपासून त्यांच्यावर औरंगाबाद येथेच उपचार सुरू होते.
अखेर रविवारी सकाळी त्यांचा औरंगाबाद येथेच मृत्यू झाला. औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयाने दिलेल्या मृत्यूच्या दाखल्यात या महिलेचा स्वाईन फ्लूूने (एच -1, एन-1) मृत्यू झाल्याने नमूद केले आहे.
या घटनेने अक्सानगर व परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून  स्वच्छता व पाण्याच्या निच:याबाबत उपाययोजना करण्याची मागणी या भागातील नागरिकांनी केली आहे.

Web Title: Death of a retired teacher swine flu