अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 18:56 IST2019-05-03T18:55:58+5:302019-05-03T18:56:05+5:30
पातोंडा येथील घटना

अज्ञात हिंस्र प्राण्याच्या हल्ल्यात पाच बकऱ्यांचा मृत्यू
पातोंडा ता.अमळनेर - येथे २ मे च्या मध्यरात्रीच्या सुमारास वरचापुरा भागातील खळयात बांधलेल्या बकऱ्यांवर अज्ञात हिंस्र प्राण्याने हल्ला करून पाच बकºयांचा फडशा पाडला. सकाळी सहा वाजेच्या सुमारास मालक भरत देवा बिरारी हे खळयात गेले असता त्यांना सर्व बकºया मानेजवळ जखम होऊन मृत अवस्थेत आढळल्या. नेहमीप्रमाणे या खळ्यात सहा बकºया, एक बोकळ, एक वासरी असे बांधले होते. यामधून पाच बकºयांचा मृत्यू झाला आहे. तर एक बकरी जखमी झाली असून बोकड व वासरी वाचले आहेत. सदर घटनेची माहिती पशूवैद्यकीय अधिकारी मुकेश पाटील यांना दिली असता त्यांनी पाहणी करुन हिंस्र प्राण्यांच्या हल्ल्यात त्या मृत झाल्याचा निष्कर्ष काढला. या बकºयांचे शवविच्छेदन करण्यात आले. सदर घटनेची माहिती भरत बिरारी यांनी वनविभागाचे अमळनेर वनपाल युवराज पाटील यांना देखील दिली आहे. नुकसानीची भरपाई संबंधित विभागाने द्यावी अशी मागणी भरत बिरारी यांनी केली आहे.