शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

जळगावात लग्नपत्रिका वाटप करुन येणाऱ्या पित्याचा रस्ता अपघातात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 2, 2018 12:33 IST

दुचाकीला धडक

जळगाव : मुलीच्या लग्नाची पत्रिका वाटप करुन घरी परत येत असताना अज्ञात वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने गंभीर जखमी झालेले डिगंबर तुकाराम पाटील (वय ५९, रा.म्हाडा कॉलनी, दूध फेडरेशनजवळ, जळगाव, मुळ रा.कडगाव, ता. जळगाव) या पित्याचा शनिवारी सकाळी उपचार सुरु असताना मृत्यू झाला. शिरसोली रस्त्यावर रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयाजवळ शुक्रवारी सायंकाळी हा अपघात झाला.डिगंबर पाटील यांची मुलगी प्रिया हिचा विवाह भुसावळ येथील युवकाशी निश्चित झाला आहे. १७ डिसेंबर रोजी तिचा जळगाव येथे विवाह सोहळा होणार आहे. त्यासाठी पाटील हे स्वत:च दुचाकीने फिरुन नातेवाईकांना पत्रिकेचे वाटप करीत होते. शुक्रवारी त्यांनी पाचोरा व म्हसावद या भागात पत्रिकांचे वाटप केल्या. सायंकाळी घरी परत येत असताना साडे सहा वाजता रायसोनी अभियांत्रिकीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. त्यात ते दुचाकीसह रस्त्याच्याकडेला फेकले गेले. लोकांनी त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले. नंतर त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. डोक्याला गंभीर मार लागला असल्याने शनिवारी सकाळी १० वाजता त्यांचा मृत्यू झाला.लग्नपत्रिकेवरुन पटली ओळखअपघाताची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन चौकशी केली असता दुचाकीत लग्नपत्रिका दिसून आल्या. लग्नपत्रिकेवर असलेल्या मोबाईलवर संपर्क साधला असता जखमी हे डिंगबर पाटील असल्याची ओळख पटली. पाटील यांना दोन मुली व एक मुलगा आहे. लहान मुलगी प्रिया हिचा विवाह निश्चित झाला आहे. १७ डिसेंबरला तिचा विवाह आहे. मुलगा शुभम बांभोरीजवळील एका कंपनीत नोकरीला असून तो अविवाहित आहे. शनिवारी दुपारी शवविच्छेदन झाल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यांच्या निधनाबद्दल कडगावसह म्हाडा कॉलनीतील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

टॅग्स :AccidentअपघातJalgaonजळगाव