विष घेतेलेल्या शेतमजुराचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2019 12:55 IST2019-09-20T12:55:35+5:302019-09-20T12:55:58+5:30
जळगाव : विषारी पदार्थ सेवन केलेल्या गणेश महादेव पाटील (४०, रा. निमखेडी बुद्रुक, ता.मुक्ताईनगर) यांचा गुरुवारी सकाळी उपचार सुरु ...

विष घेतेलेल्या शेतमजुराचा मृत्यू
जळगाव : विषारी पदार्थ सेवन केलेल्या गणेश महादेव पाटील (४०, रा. निमखेडी बुद्रुक, ता.मुक्ताईनगर) यांचा गुरुवारी सकाळी उपचार सुरु असताना जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला.
गणेश पाटील हा तरुण शेती काम करायचा. बुधवारी सायंकाळी ६ वाजेच्या सुमारास त्याने राहत्या घरी फवारणीचे विषारी औषध सेवन केले होते. गणेशच्या पश्चात आई अंजनाबाई, वडील महादेव पाटील, पत्नी रत्नमाला, प्रणाली आणि कल्पना या दोन मुली आणि मिलिंद नावाचा मुलगा असा परिवार आहे.