शौचास जाताना विहिरीत पडल्याने मृत्यू

By Admin | Updated: May 28, 2017 12:27 IST2017-05-28T12:27:06+5:302017-05-28T12:27:06+5:30

खंडाळा : पाय घसरल्याने दुर्घटना

Death due to falling into well in the twenties | शौचास जाताना विहिरीत पडल्याने मृत्यू

शौचास जाताना विहिरीत पडल्याने मृत्यू

ऑनलाईन लोकमत

भुसावळ,दि.28 - तालुक्यातील खंडाळा येथे शौचास जाताना रात्री अंधारात पाय घसरल्याने विहिरीत पडल्याने एकाचा मृत्यू झाला़ प्रदीप काशीनाथ पाटील (23, खंडाळा, ता़भुसावळ) असे मयत युवकाचे नाव आह़े या संदर्भात तालुका पोलीस ठाण्यात किरण सुभाष पाटील यांनी खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली़ 27 रोजी रात्री साडेनऊ वाजता प्रदीप हे जि़प़शाळेमागे शौचास गेले असता रात्री अंधारात त्यांचा पाय घसरून ते ग्रा़पं़च्या विहिरीत पडले व पाण्यात बुडाल्याने त्यांचा मृत्यू झाला़ तपास सहाय्यक फौजदार शशीकांत चौधरी, अजय माळी, रियाज शेख करीत आहेत़

Web Title: Death due to falling into well in the twenties