अमळनेर येथील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2020 15:40 IST2020-04-30T15:40:31+5:302020-04-30T15:40:48+5:30
मृतांची संख्या आता १०

अमळनेर येथील आणखी एका कोरोना बाधिताचा मृत्यू
जळगाव : अमळनेर येथील कोरोनाबाधित ६५ वर्षीय इसमाचा जळगावच्या कोविड रुग्णालयात मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास घडली. यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांची संख्या आता १० वर पोहचली आहे तर अमळनेर येथील मृतांची संख्या सहा झाली आहे.
दरम्यान, बुधवार २९ रोजी पाच जणांचे अहवाल निगेटीव्ह आले होते. त्यामुळे जिल्हाला थोडाफार दिलासा मिळेल, असे वाटत असतानाच गुरुवारी दुपारी एका बाधित रुग्णाचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे.