शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

आपसातील वादामुळे डीन डॉ.खैरे यांची उचलबांगडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 12:21 PM

तक्रारीनंतर पदावरून हटविले : तीन वर्ष दिली सेवा, नव्या डीनकडून मोठ्या अपेक्षा

जळगाव : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे यांच्या जागेवर नियमित अधिष्ठाता म्हणून डॉ़ मिनाक्षी गजभिये यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे़ मात्र, खैरे यांना कुठे नियुक्ती देण्यात आली. याबाबत कुठलेही आदेश अद्याप प्राप्त नाहीत, दरम्यान, त्यांना पदावरून हटविण्यामागे अधिकाऱ्यांमधील वाद व वाढलेला मृत्यूदर व तक्रारी या बाबींची किनार असल्याचे समोर येत आहे़ काही दिवसांपूर्वी या मुद्द्यांवरून सोशल मीडियावरही मोठी चर्चा झाली होती़शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे पहिले अधिष्ठाता या पदावर डॉ़ भास्कर खैरे यांची नियुक्ती करण्यात आली होती़ त्यांच्या कार्यकाळात चिंचोली परिसरात एकात्मीक वैद्यकीय संकुल उभारणीला मोठी चालना मिळाली. या ठिकाणी मोठे मेडिकल हब उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे़ त्यात जळगावात कोरोना संसर्ग वाढल्याने या संपूर्ण रुग्णालयालाच कोविड रुग्णालय म्हणून घोषित करण्यात आले होते़अधिकाऱ्यांमधील वादाचीही किनारशासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ़ भास्कर खैरे व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ एऩ एस़ चव्हाण यांच्या वादात आरोग्य यंत्रणा खिळखिळी झाल्याचा मुद्दा वारंवार मांडला जात होता़ याच मुद्दयावर जिल्हा आरोग्य समन्वय समितीच्या सभेतही वादळी चर्चा झाली होती़ लोकप्रतिनिधींनी अखेर कोविड रुग्णालयच दुसरीकडे हलवा असा आक्रमक मुद्दा पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्यासमोर मांडला होता़ तेव्हापासूनच बदलाचे वारे तीव्र झाले होते़ अधिकाºयांमधील हा वादही बदलीमागचे एक कारण असल्याचे सांगितले जात आहे़लवकरच आणखी एक बदली?कोरोनाने जळगावात पहिली मोठी बदली झाली असून येत्या एक दोन दिवसात रुग्णालय प्रशासनातील आणखी एका अधिकाºयाची बदली होणार असल्याचे मॅसेज शुक्रवारी सायंकाळी सोशल मीडियावर व्हायरल होत होते़ त्यामुळे हे अधिकारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे़असे आहे आव्हानजिल्ह्यातील मृत्यूदर वाढून मृत्यूची संख्या आटोक्यात आणणे, कोविड रुग्णालयातील असुविधांच्या बाबतीत आलेल्या तक्रारी, झपाट्याने वाढणारी रुग्णसंख्या, मनुष्यबळाची कमतरता, अशी आव्हाने नवीन अधिष्ठाता डॉ़ मिनाक्षी गजभिये यांच्यासमोर राहणार आहेत़वर्षभरात संस्था सुरू झाली त्यात योगदानाचे समाधान: डॉ़ खैरेराज्यभरात अनेक ठिकाणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या घोषणा झालेल्या होत्या, मात्र प्रत्यक्ष सुरू झालेले नव्हते़ जळगाव एकमेव ठिकाण असे आहे की त्या ठिकाणी घोषणा होऊन वर्षभरात शासकीय महाविद्यालय सुरू झाले़ या ठिकाणी आपली नियुक्ती झाली व या तीन वर्षात आपण यात योगदान देऊ शकलो याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया डॉ़ भास्कर खैरे यांनी ह्यलोकमतह्णला दिली आहे़ या तीन वर्षात जळगावकरांचे प्रेम मिळाले़ काम करण्याची संधी मिळाली़ माजी मंत्री गिरीश महाजन, विद्यमान पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कार्याची दखल घेतल्याचे ते म्हणाले.सरकारने योग्य निर्णय घेतला आहे़ डॉ़ भास्कर खैरे यांच्या नेतृत्वात कोविड रुग्णालयात कुठलेच नियोजन होत नव्हते़ मृत्यदर नियंत्रणात येत नव्हता़ त्यामुळे नवीन येणाºया अधिष्ठाता यांच्या नेतृत्वात कोविड रुग्णालयात सुविधा मिळतील व मृत्यूदर कमी होईल, अशी अपेक्षा आहे़-अभिषेक पाटील,राष्ट्रवादी महानगराध्यक्षजिल्ह्यात गेल्या २० दिवसात प्रचंड संसर्ग वाढला आहे़ तब्बल ३८१ रुग्ण वाढले आहे़ ज्यावेळी शंभर रुग्ण होते, त्याचवेळी मी उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना टिष्ट्वट करून जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, डीन यांच्या बदलीची मागणी केली होती़ त्यानुसार डीन यांची बदली झाली़ नवीन डीन चांगले काम करतील अशी अपेक्षा आहे़ लॉकडाऊनच्या काळात नियमबाह्य सूट देण्यात आली त्यामुळे प्रचंड संसर्ग वाढला हे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे झाले आहे़ त्यामुळे जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांची बदली व्हावी, अशी मागणी आहे़ तसे आश्वासनही मिळाले़- योगेश देसले, प्रदेश प्रवक्ता राष्ट्रवादी काँग्रेस.

टॅग्स :Medicalवैद्यकीयJalgaonजळगाव