“खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती”

By सुनील पाटील | Updated: June 27, 2023 15:02 IST2023-06-27T15:00:14+5:302023-06-27T15:02:36+5:30

देवेंद्र फडणवीस यांची जळगावात टीका.

dcm devendra fadnavis criticised ncp eknath khadse in jalgaon | “खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती”

“खडसेंनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती”

जळगाव: एकनाथ खडसे यांनी जमिनीत तोंड काळं केलं नसतं तर आज त्यांच्यावर आम्हाला काळे झेंडे दाखविण्याची वेळ आली नसती. त्यांना आता नवीन मालक मिळाला आहे, ते सांगतात तसंच ते करतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माजी मंत्री तथा राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यावर टीका केली.

शासन आपल्या दारी अभियानातंर्गत जळगाव जिल्हास्तरीय कार्यक्रमासाठी फडणवीस यांचे दुपारी जळगाव विमानतळावर आगमन झाले. त्यावेळी पत्रकारांशी ते बोलत होते. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांचे स्वागत केले. 

 मोदी यांच्यामुळे देशभरात भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कारवाई होत आहे. ते पंतप्रधान राहिले तर...अनेक घोटाळे बाहेर येतील, आपले सांगाडे बाहेर येतील हे लक्षात आल्यामुळे विरोधक सर्व एकत्र आले आहेत, असा हल्लाबोलही फडणवीस यांनी विरोधकांवर केला आहे.खडसे यांनी भोसरीत खरेदी केलेल्या जमिनीवरुन फडणवीस यांनी त्यांना लक्ष्य केले.

Web Title: dcm devendra fadnavis criticised ncp eknath khadse in jalgaon