कन्येने घेतली आमदार पित्याची गळाभेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:12 IST2021-06-28T04:12:21+5:302021-06-28T04:12:21+5:30

मुलगी सासरला जाताना कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटायला आली. कार्यक्रम चालू असल्यामुळे आमदार पिता मुलीला भेटू शकले नाहीत. या कार्यक्रमात ...

The daughter took the MLA's father's hug | कन्येने घेतली आमदार पित्याची गळाभेट

कन्येने घेतली आमदार पित्याची गळाभेट

मुलगी सासरला जाताना कार्यक्रमाच्या ठिकाणी भेटायला आली. कार्यक्रम चालू असल्यामुळे आमदार पिता मुलीला भेटू शकले नाहीत. या कार्यक्रमात मुलगी डाॅ. प्रियंकाचा गावामार्फत एका महिलेच्या हस्ते शाल, पुष्पहार देउन स्वागत करण्यात आला. मुलीला जणू सासरी जाण्याचा निरोप देण्यात आला. आमदार किशोर पाटील व उपस्थितांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरारत असल्याचे दिसून आले. हा पिता व मुलीचा अनोखा प्रसंग पाहून उपस्थित सारे भावनाविवश झाले.

दि. २६ रोजी रात्री आमदार किशोर पाटील यांची कन्या सासरहून पाचोरा माहेरी लग्न झाल्यापासून प्रथमच आलेली होती. दि. २७ रोजी पित्याची भेट घेण्यासाठी आमदारांना फोनवर फोन लावत घरी वाट पाहत होती. मात्र आमदार किशोर पाटील हे आज तांदुळवाडी येथील कार्यक्रमात होते. सासरला जाताना डाॅ. प्रियंका ही तांदुळवाडी फाट्याजवळ भेटण्यासाठी फोनवर संपर्क साधत वाट पाहत होती. मात्र, ते न आल्याने डाॅ. प्रियंका यांनी अखेर तांदुळवाडीचा कार्यक्रम गाठला.

===Photopath===

270621\27jal_3_27062021_12.jpg

===Caption===

तांदुळवाडी येथील कार्यक्रमात आमदार किशोर पाटील यांची कन्या डाॅ. प्रियंका आमदार पित्याची भेट घेताना. 

Web Title: The daughter took the MLA's father's hug