रावेरला दरेकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:22 IST2021-09-17T04:22:09+5:302021-09-17T04:22:09+5:30
रावेर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांबाबत अतिशय अपमानास्पद व लज्जास्पद वक्तव्य केल्याने त्यांचा ...

रावेरला दरेकरांचा राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीतर्फे निषेध
रावेर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महिलांबाबत अतिशय अपमानास्पद व लज्जास्पद वक्तव्य केल्याने त्यांचा राष्ट्रवादी महिला आघाडीसह पक्षाच्या सर्व फ्रंटलच्या वतीने निषेध करून तहसीलदारांना निवेदन दिले.
विधिमंडळाच्या वरिष्ठ सभागृहाचे विरोधी पक्षनेते पद सांभाळणाऱ्या व्यक्तीने महिलांबाबत असे वक्तव्य करणे म्हणजे दरेकरांची वैचारिक दरिद्र्यता दिसून येत असून, त्यांनी तत्काळ आपले विधान मागे घ्यावे व महिलांची जाहीर माफी मागावी, असे निवेदनात नमूद केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या तालुकाध्यक्ष माया बारी, महिला उपाध्यक्षा इंदू हिवरे, तालुका सरचिटणीस कविता गोडसे, तालुकाध्यक्ष नीळकंठ चौधरी, पं. स. सदस्य योगेश पाटील, शहराध्यक्ष मेहबुब शेख, युवक तालुकाध्यक्ष सचिन पाटील, ओबीसी सेल तालुकाध्यक्ष सुनील कोंडे, पदवीधर सेलचे तालुकाध्यक्ष, युवक जिल्हा उपाध्यक्ष कुणाल महाले यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.