Damania absent in Khadse's defamation lawsuit | खडसेंच्या बदनामीच्या खटल्यात दमानिया गैरहजर
खडसेंच्या बदनामीच्या खटल्यात दमानिया गैरहजर

जळगाव : बदनामी केल्याप्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्या विरोधात दाखल केलेल्या अब्रुनुकसानीच्या खटल्यात गुरुवारी दमानिया हजर झाल्या नाहीत.
मुलगा विदेशात जात असल्याने आपण न्यायालयात हजर राहू शकत नसल्याने पुढची तारीख द्यावी, असा विनंती अर्ज त्यांनी वकीलातर्फे सादर केला.
या प्रकरणी ४ मार्च रोजी कामकाज होणार आहे. न्या. प्रिती श्रीराम यांच्या न्यायालयात हा खटला सुरु आहे.
खडसे यांच्यावतीने अ‍ॅड. प्रकाश बी.पाटील उपस्थित होते. दमानिया यांच्यावतीने अ‍ॅड.सुधीर कुळकर्णी यांनी काम पाहिले.

Web Title:  Damania absent in Khadse's defamation lawsuit

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.