शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

जळगाव मनपा क्षेत्रात 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संचारबंदी लागू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 7:03 PM

  जळगाव  - युकेमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात ...

 जळगाव  - युकेमध्ये कोरोनाचा नवीन विषाणू आढळून आला आहे. या पार्श्वभूमीवर सावधगिरीचा उपाय म्हणून जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात येत आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिली.

            राज्य शासनाने राज्यातील सर्व महानगरपालिका क्षेत्रात आजपासून 5 जानेवारीपर्यंत रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत संपूर्ण संचारबंदी लागू करण्याची घोषणा केली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांच्या दालनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी श्री. राऊत बोलत होते. या पत्रकार परिषदेस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, महानगरपालिका आयुक्त सतीश कुलकर्णी उपस्थित होते.  

            जिल्हाधिकारी  राऊत पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीमध्ये जळगाव जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आलेला असताना युकेमध्ये आता कोरोनाच्या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून येत आहे. त्यातच सध्या जिल्ह्यात थंडीचे प्रमाण वाढत असल्याने निमोनियासारखे आजार बळावतात. याबाबत दक्षता घेणे आवश्यक असल्याने मनपा क्षेत्रात संचारबंदी लागू करण्यात येत आहे. संचारबंदीच्या काळात वैद्यकीय सेवेसारख्या अत्यावश्यक सेवा वगळण्यात येत आहे. मात्र यासाठी पुरेसे पुरावे सोबत ठेवणे आवश्यक आहे. तसेच रात्री बाहेरगावावरुन येणाऱ्या प्रवाशांना कोणतीही अडचण येणार नाही. मात्र नागरीकांनी लग्न समारंभ व इतर कार्यक्रम रात्री 11 पूर्वीच उरकणे आवश्यक आहे. तसेच औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार वर्गास कोणतीही अडचण येवू नये याकरीता या कालावधीत त्यांच्या कामाच्या वेळा या रात्री 11 पूर्वी व सकाळी 6 नंतर ठेवण्याबाबत आस्थापनांना सुचना देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

            कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वोतोपरी तयारी केलेली आहे. याकरीता 33 ऑक्सिजन सेंटरचे नियोजन करण्यात आले आहे. औषधांचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. कोणत्याही परिस्थितीस प्रशासन सज्ज असले तरी नागरीकांनीही सतत मास्कचा वापर करावा, विनाकारण बाहेर पडू नये, गर्दीच्या ठिकाणी जाताना आवश्यक दक्षता घेण्याचे आवाहनही जिल्हाधिकारी यांनी यावेळी केले.

31 डिसेंबर रोजी जिल्ह्यातील सर्व नगरपालिका क्षेत्रात राहणार संचारबंदी

 31 डिसेंबर रोजी होणारी गर्दी लक्षात घेता कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता 31 डिसेंबरच्या रात्री 11 ते 1 जानेवारीच्या सकाळी 6 या वेळेत जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील सर्व नगरपालिका व नगरपंचायत क्षेत्रातही संचारबंदी लागू करण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी यांनी यावेळी सांगितले.

संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई - डॉ मुंढे

   कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने लागू केलेल्या संचारबंदी आदेशाचे जळगाव शहर महानगरपालिका क्षेत्रातील नागरीकांनी तंतोतंत पालन करावे. असे आवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ प्रवीण मुंढे यांनी केले आहे. जे नागरीक या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांचेवर दंडात्मक कारवाई बरोबरच आवश्यकता भासल्यास गुन्हेही दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. या आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सुचना पोलीस स्टेशनच्या प्रभारी यांना दिल्या आहेत. त्याचबरोबर शहरातील प्रमुख पॉईट तसेच पेट्रोलिंग करणाऱ्यांमार्फतही तपासणी करण्यात येणार आहे. मास्क न वापरणाऱ्यांवर पोलीस व महापालिकेचे संयुक्त पथक कारवाई करण्यासाठी कार्यरत राहणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीJalgaonजळगाव