खामखेडे येथे जि.प.च्या ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2020 02:47 PM2020-01-25T14:47:42+5:302020-01-25T14:48:37+5:30

खामखेडे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत उचंदा केंद्रातील ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.

Cultural Festival of 3 Zip Schools in Khamkhed | खामखेडे येथे जि.प.च्या ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव

खामखेडे येथे जि.प.च्या ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव

googlenewsNext
ठळक मुद्देउचंदा केंद्रातील ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सवयाआधी पार पडला बालआनंद मेळावाविद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सादर केले विविध कला गुणदर्शन

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील खामखेडे येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत उचंदा केंद्रातील ११ शाळांचा सांस्कृतिक महोत्सव उत्साहात पार पडला.
याआधी बालआनंद मेळावा घेण्यात आला. त्याचा आनंद विद्यार्थी शिक्षक व पालकांनी घेतला. त्यानंतर ११ शाळेतील विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होत विविध कला गुणदर्शन सादर केले. पालकांनी त्यांचे कौतुक केले . याप्रसंगी विनोद सोनवणे यांनी कार्यक्रमाला भेट दिली. त्यानी प्रत्येक शाळेला ट्रॉफी, पदक व प्रमाणपत्र यासाठी योगदान दिले.
या कार्यक्रमात जिल्हा शिक्षक पुरस्कार प्राप्त सुरेश रुपचंद सोनवणे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. तसेच जगताप यांच्या मुलीने पदक मिळवल्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी विश्वनाथ धनके व उचंदा केंद्राचे केंद्रप्रमुख ठोसर यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी खामखेडे येथील सरपंच वत्सला सोनवणे होत्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष रमेश गवते, जि.प.सदस्या वैशाली तायडे, पंचायत समिती सदस्य शुभांगी भोलाणे अतिथी होते.
सूत्रसंचालन जयवंत बोदडे, पल्लवी कळमकर, साहित्यिक अ. फ. भालेराव व सुरेश बोरसे यांनी केले. आभार ज्ञानेश्वर पाटील यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी केंद्रातील शिक्षक सदार, मोरे, ई.ओ.पाटील, खैरनार, बोरकर, जगताप, पवार, वारके, अडकमोल, परखड, संगीता पाटील यांनी परिश्रम घेतले.

Web Title: Cultural Festival of 3 Zip Schools in Khamkhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.