ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीवर पवित्र स्नानासाठी महिलांची गर्दी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:20 IST2021-09-12T04:20:21+5:302021-09-12T04:20:21+5:30
यादिवशी सप्त ऋषींची पूजा करून गंगेत, तापीत किंवा अन्य काही नद्यांमध्ये स्नान केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी व धन ...

ऋषीपंचमीनिमित्त तापी नदीवर पवित्र स्नानासाठी महिलांची गर्दी
यादिवशी सप्त ऋषींची पूजा करून गंगेत, तापीत किंवा अन्य काही नद्यांमध्ये स्नान केल्यास जीवनात सुख, शांती, समृद्धी व धन प्राप्त होते तसेच पाप धुतले जाते अशी धारणा आहे. यावेळी महिलांनी तापी नदीत स्नान करुन, नदीकाठालगत असलेल्या सप्तऋषी मंदिरात जाऊन पूजन केले.
भाद्रपद मास शुक्ल पक्ष मुहूर्तावर येणाऱ्या पंचमीला ऋषी पंचमीचे हे व्रत करण्यात येते. गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी सप्त ऋषींची पूजा केली जाते. हे व्रत जीवनात पाप नाश व मुक्तीसाठी करण्यात येते. तसेच हे व्रत केल्यास महिलांची मनोकामना पूर्ण होते, अशी मान्यता आहे. महिला सप्त ऋषींची विधीनुसार पूजा करून सुख,शांती,समृद्धी,धन-धान्य,संतती प्राप्तीची मनोकामना करतात. हळद, चंदन, फुलं, अक्षता यांचा अभिषेक करून क्षमायाचना केली जाते. अविवाहित महिलांसाठीही हे व्रत विशेष फलदायी मानले जाते.
भुसावळातील तापी नदीवर महिलांची स्नानासाठी झालेली गर्दी. (छाया : श्याम गोविंदा)