शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पिकांची झाली लाही लाही, विहिरीतही पाणी नाही...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 3:39 PM

महिंदळे परिसरातील स्थिती बिकट: पाझर तलाव, केटीवेअर, नाले, विहिरी अजूनही कोरडेठाकच

महिंदळे, ता.भडगाव : अर्धा पावसाळ्यातच जिल्ह्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली आहेत. नदी काठावरच्या जनतेचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. जिल्ह्यातील नदी नाले खळाळून वाहत आहेत.  परंतु महिंदळे परिसर मात्र याला पूर्णपणे अपवाद ठरत आहे. पावसाच्या सुरुवातीपासून परिसरावर पावसाची अवकृपा झाली आहे. आजतागायत एकही दमदार पाऊस पडला नाही. त्यामुळे परिसरातील नाले अजून वाहिले नाहीत. परिणामी पाझर तलाव, केटीवेअर, विहिरी अजूनही कोरडे ठाक आहेत. त्यामुळे पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. पिकांची अवस्था पाहून शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाची सुरुवातच परिसरात अडखळत झाली. शेतकºयांनी तुरळक  पावसाच्या भरवशावर पिकांची पेरणी केली. तुरळक पावसामुळे  पिकेही जोमदार होती. आता मात्र पिके मोठी झाल्यामुळे पिकांना दमदार पावसाची गरज आहे. पावसाने परिसरात गेल्या महिनाभरापासून डोळे वटारल्यामुळे पिकांनी पूर्ण माना टाकल्या आहेत. परिसरात एकही दमदार पाऊस नसल्यामुळे पिकांची पूर्ण वाढ खुंटली आहे. पाऊस नसल्यामुळे खते घरात पडून परिसरात अनेक शेतकºयांनी विहिरींच्या पाण्यावर ठिबक सिंचनाच्या माध्यमाने उन्हाळी कपाशी लागवड केली व काहींनी पावसाच्या पाण्यावर कपाशी, मका, ज्वारी, बाजरी, भेंडी, व कडधान्ये लागवड केली आहे. पिके आता मोठी झाल्यामुळे त्यांना दमदार पावसाची आवश्यकता आहे. पिकांना वेळेवर खते व पाणी मिळत नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली आहे. दमदार पाऊस येत नसल्यामुळे  खते घरातच पडून आहेत. श्रावण सरींनीही दाखवली पाठ  परिसरात श्रावण महिना अर्धा संपला तरी श्रावण सरी बरसल्या नाहीत. श्रावणात वातावरणात गारवा असतो परंतु सूर्यदेव कडक उन्हाच्या झळा ओकत आहे. पिकांची लाही लाही झाली आहे. परिणामी पिकांनी माना टाकल्या आहेत.