नगरदेवळा परिसरात दुबार पेरणीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:11 IST2021-07-03T04:11:22+5:302021-07-03T04:11:22+5:30

जुनच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केेल्या; दरम्यान पावसाने एकदा हजेरी लावली त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली. ...

Crisis of double sowing in Nagardevala area | नगरदेवळा परिसरात दुबार पेरणीचे संकट

नगरदेवळा परिसरात दुबार पेरणीचे संकट

जुनच्या सुरुवातीला बरसलेल्या पावसावर अनेक शेतकऱ्यांनी पेरण्या पूर्ण केेल्या; दरम्यान पावसाने एकदा हजेरी लावली त्यानंतर मात्र पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे. परिसरात समाधानकारक पाऊस न झाल्याने सुरुवातीला केलेला पेरणीचा सर्व खर्च वाया गेला आहे. महागडी बियाणे, रासायनिक खते, शेतमजुरी आदी सर्व पाण्याअभावी वाया गेल्याने कर्जाच्या बोजाखाली शेतकरी दाबला जात आहे. दिवसा कडकडीत ऊन व भयंकर उकाड्यामुळे पिके करपली आहेत. तर अनेक शेतातील बी पक्षी कोरून खात आहेत. ‘कोरोनाची आढी, पावसाची दडी व शेतकऱ्यांची विस्कटली आर्थिक घडी’ अशी स्थिती झाली आहे. त्यात भरमसाठ वाढलेल्या महागाईने जगाच्या पोशिंद्यावर संकटाचा मोठा भार वाढला आहे. शासनाने मदतीचा हात द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

Web Title: Crisis of double sowing in Nagardevala area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.