अमळनेरात जेलमधून सुटलेल्या एक गुन्हेगाराचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 20:46 IST2020-04-10T20:46:09+5:302020-04-10T20:46:19+5:30
राकेश वसंत चव्हाण हा जेलमध्ये होता, नुकताच अमळनेर शहरात आला होता,

अमळनेरात जेलमधून सुटलेल्या एक गुन्हेगाराचा खून
जळगाव : नुकताच जेलमधून सुटलेल्या एक गुन्हेगाराचा डोक्यात लाकडी दांडक्याने खून केल्याची घटना 10 रोजी रात्री साडेसात ते पावणेआठ वाजताच्या दरम्यान घडली. राकेश वसंत चव्हाण हा जेलमध्ये होता, नुकताच अमळनेर शहरात आला होता, सायंकाळी तो ख्वाजा नगरमध्ये आला होता तेथे काही लोकांशी त्याने दारूच्या नशेत वाद झाल्याचे समजते, त्यांनतर लोकांनी त्याला तेथून जाण्यास सांगितले, मात्र त्याने दगडफेक केली संतप्त जमावाने त्याला लाकडी दंडक्याने मारल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला घटनास्थळी डीवायएसपी राजेंद्र ससाणे, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे यांनी भेट दिली