जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या एस.पींच्या रडारवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2019 11:59 AM2019-07-07T11:59:43+5:302019-07-07T12:04:04+5:30

विविध गृपच्या नावाने फिरणारे आणि  गुन्हेगारी करणारे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या कायमस्वरुपी संपविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यासाठी २० पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील टोळ्या, विविध गृप व स्वतंत्ररित्या गुन्हे करणाºया गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.

Criminal gangs in Jalgaon city on the radar of SP | जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या एस.पींच्या रडारवर

जळगाव शहरातील गुन्हेगारी टोळ्या एस.पींच्या रडारवर

Next
ठळक मुद्देस्वतंत्र पथकाची नियुक्ती  संघटीत गुन्हे करणा-यांची यादी तयारमोका, एमपीडीएसारखी कठोर कारवाई

जळगाव : विविध गृपच्या नावाने फिरणारे आणि  गुन्हेगारी करणारे गुन्हेगार व त्यांच्या टोळ्या कायमस्वरुपी संपविण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ.पंजाबराव उगले यांनी कठोर पाऊले उचलली आहेत. त्यासाठी २० पोलिसांचे स्वतंत्र पथक तैनात करण्यात आले आहे. शहरातील टोळ्या, विविध गृप व स्वतंत्ररित्या गुन्हे करणा-या गुन्हेगारांची यादी तयार करण्यात आली आहे.
मू.जे.महाविद्यालयाचा विद्यार्थी मुकेश सपकाळे या तरुणाची महाविद्यालयाच्या आवारातच खून झाल्याची घटना गेल्या शनिवारी घडली होती. या घटनेत अटक केलेले संशयित हे जे उद्याचे भविष्य समजतो ते तरुणच गुन्हेगारीकडे वळल्याचे पाहून पोलीस अधीक्षकांनी शहरातील तरुणांमधील गुन्हेगारी कायमस्वरुपी संपुष्टात आणण्यासाठी उपाययोजना करायला सुरुवात केली आहे. गुन्हेगारांमध्ये दबदबा तसेच त्यांची पार्श्वभूमी माहित असलेल्या मोजक्याच २० पोलिसांची निवड पोलीस अधीक्षकांनी केली आहे. या कर्मचाºयांची एक बैठक नुकतीच झाली. या बैठकीत गुन्हेगारी करणाºया टोळ्या, संघटीत गुन्हेगार, विविध गृप यांची यादी तयार करण्यात आली.  त्याशिवाय भविष्यात करावयाची कारवाई  व उपाययोजना याचे नियोजन करण्यात आले. दरम्यान, या गुन्हेगारांचे फोटोही संकलित करण्यात आले आहेत. शहरात लावण्यात येत असलेल्या फलकांवरही पोलिसांची नजर आहे.
विना क्रमांकाचे वाहने रडारवर
शहरात गुन्हेगारी करणा-या वेगवेगळ्या गृपच्या तरुणांनी त्यांच्या दुचाकींवर क्रमांकाऐवजी गृपचे नाव टाकले आहे. एकेका दुचाकीवर तीन जण मिळूनच हे तरुण वावरत असतात,अशी वाहने जमा करण्याचे आदेश शहर वाहतूक शाखेला देण्यात आले आहेत. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेचे निरीक्षक देविदास कुनगर यांनी क्रमांक टाकल्याशिवाय दुचाकी बाहेर जावू नये याबाबत शनिवारी दुचाकी विक्री करणा-या व्यावसायिकांना पत्र दिले. 
पथक थेट एस.पींच्या नियंत्रणात
नव्याने तयार करण्यात आलेल्या पथकातील प्रत्येक कर्मचारी हा थेट पोलीस अधीक्षकांच्या संपर्कात राहणार आहे. त्यासाठी स्वतंत्र व्हाटस्अ‍ॅप गृपही तयार करण्यात येणार आहे. गुन्हेगारांवर कारवाया करताना लागणारी मदत देखील पोलीस अधीक्षकच उपलब्ध करुन देणार आहे. या पथकात पोलीस ठाणे व एलसीबीचे मोजकेच कर्मचारी घेण्यात आलेले आहेत. 
-तरुण मुले गुन्हेगारीकडे वळल्याने त्यांचे भवितव्य वाईट आहे. वेळीच त्यांना रोखणे गरजेचे आहे. तरुणांना गुन्हेगारीपासून रोखण्यासाठी  हद्दपारी, मोका व एमपीडीएसारखी कठोर कारवाई जाणार आहे. तरुणांमधील गुन्हेगारी संपुष्टात आणणे हाच आपला संकल्प आहे. 
-डॉ.पंजाबराव उगले, पोलीस अधीक्षक

Web Title: Criminal gangs in Jalgaon city on the radar of SP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.