शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
2
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
3
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
4
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
5
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
6
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
7
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
8
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
9
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
10
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
11
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
12
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
13
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
14
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
15
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
16
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
17
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
18
बापाचं काळीज! "मॅडम, माझ्या मुलीला मारू नका, हिला आई नाही"; Video पाहून पाणावतील डोळे
19
स्टेट बँक ऑफ इंडियाचं जुनं नाव माहीत आहे? ३४० वर्षांपूर्वी एका ब्रिटीश बँकेपासून झाली होती सुरुवात
20
'भाभीजी घर पर है' मालिकेत परतली शिल्पा शिंदे, भावुक प्रतिक्रिया देत म्हणाली, "मी कधीच चुकीचं..."
Daily Top 2Weekly Top 5

पहूर पोलिस स्टेशनमध्ये मारहाण करणाऱ्या सांगवीतील तेराजणांविरूध्द दंगलीचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2019 16:52 IST

अल्पवयीन मुलगी व पोलीसाकडून तक्रार

 

 

 

पहूर ता जामनेर : येथील पोलिस स्टेशनमध्ये हाणामारी करणाºया सांगवीतील १३ जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सांगवी येथे लहान मुलांच्या भांडणावरून तडवी समाजाच्या दोन गटात शनिवारी रात्री हाणामारी झाली होती. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाला होता. या मुलीच्या तक्रारीवरून तसेच पहूर पोलिस स्टेशनमध्ये पोलीसांसमक्ष पुन्हा या दोन गटांनी आपसात मारहाण केली होती. याप्रकरणी पोलीस कर्मचाºयाच्या तक्रारीवरून १३ जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित लोक फरार असून सांगवीत लहान मुलांचे भांडणे शनिवारी रात्री झाले होते यावरून तडवी समाजाच्या दोन गटांनी हाणामारी केली. यादरम्यान एका अल्पवयीन मुलीचा विनयभंगही झाला. दोन्ही गट पहूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यास आले असता पोलीसांसमक्ष पुन्हा तुफान हाणामारी केली. यात भांडण सोडविणारे पोलीस कर्मचारी विनय सानप किरकोळ जखमी झाले आहे. याच वेळी जमावातील काहींनी पोलिस स्टेनवर किरकोळ दगड फेक केली होती.याप्रकवणी गावातील घटनेबाबतम अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून अकबर समसोद्दीन तडवी, अनिल शब्बीर तडवी, बादशहा समसोद्दीन तडवी, अकबर समसोद्दीन तडवी, सुग्रा अनिल तडवी, दिलावर शब्बीर तडवी , शाहरूख सिराज तडवी, इकबाल तडवी, मनोज बनारखाँ तडवी, मौसीम अनिल तडवी, दिलीप बाबू तडवी, आकाश अकबर तडवी व हिलाल अनिल तडवी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कडक कारवाईच्या सूचनाघटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक डॉ. पंजाबराव उगले यांनी डिवायएसपी ईश्वर कातकडे यांना कडक कारवाईच्या सुचना दिल्यावरून पोलीस कर्मचारी रमण कंडारे यांची तक्रार दाखल केली आहे.दरम्यान पोलिस कर्मचारी रमण कंडारे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वरील तेरा जणांविरूध्द भा.द.वी.३५४,३२३,५०४,५०६,१४३,१४७,१४९, प्रमाणे दंगल, दमदाटी, मारहाण व विनयभंग असा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाचोरा विभागाचे डीवायएसपी ईश्वर कातकडे यांनी रविवारी दिवसभर या घटनेची चौकशी केलीे.कायदा सुव्यवस्थेचे काय ?पोलीसांमक्ष पोलीस स्टेशनमध्ये दोन गट आमने सामने येऊन हाणामारी करतात. भांडण सोडविणाºया पोलीस कर्मचाऱ्यांला धकाबुक्की केली जाते, एवढेच नव्हे तर हातात दगड घेऊन पोलीस स्टेशनवर भिरकवितात. या फोफावलेल्या गुन्हेगारी प्रव्रुत्तीमुळे खुद्द पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असून नागरीकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. त्यामुळेच कायदा व सुव्यवस्थेचे काय? असा प्रश्न ही समाजमनाला पडला आहे.सांगवी धुमसतेयसांगवी गावात अनेक दिवसांपासून छोट्या मोठ्या घटना घडत आहेत. पोलिसांच्या रेकॉर्डवर सांगवी अलीकडच्या काळात संवेदनशील म्हणून समोर आले आहे. थातुरमातुर कारवाईमुळे गुन्हेगारीला बळ मिळत आहे. वेळीच गंभीर दखल पोलिसांनी घेतली असती तर पोलीसांना हा दिवस पहावयास लागला नसता, असाही सुर उमटत आहे. 

 

 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी