दिराच्या आत्महत्येप्र्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2019 12:21 IST2019-03-23T12:20:29+5:302019-03-23T12:21:08+5:30

वडीलोपार्जित शेत जमिनीचा वाद

Crime against women police commits suicide | दिराच्या आत्महत्येप्र्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा

दिराच्या आत्महत्येप्र्रकरणी महिला पोलिसाविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देममुराबाद येथील घटना


जळगाव : वडीलोपार्जित शेत जमिनीच्या वादातून दिनकर नगर येथील भरत गणपत सपकाळे या तरूणाने विषारी द्रव सेवन केले होते़ मात्र, गुरूवारी त्या युवकाचा उपचार घेत असताना मृत्यू झाला़ याप्रकरणी त्याच्या वहिनी आणि एमआयडीसी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस प्रविणा जाधव यांच्याविरूध्द आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
मयत भरत याचे ममुराबाद शिवारात वडीलोपार्जित शेत आहे. भरतची वहिनी प्रविणा जाधव या पोलीस कर्मचारी असल्याने त्या हिस्सा देण्यासाठी नकार देत असल्याने त्यांच्यात नेहमी वाद होत होते. या वादातूनच ११ मार्च रोजी दुपारी भरत सपकाळे याने ममुराबाद येथील शेतात काहीतरी विषारी द्रव सेवन केल्याने त्याच्यावर जिल्हा रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. २१ रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास भरत याचा मृत्यू झाला. सायंकाळी मयत भरतची पत्नी आशाबाई सपकाळे यांच्या फिर्यादीवरून प्रविणा गजानन जाधव यांच्याविरुध्द शनिपेठ पोलिसात भादंवि कलम ३०६ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against women police commits suicide