महिलेवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2019 00:03 IST2019-09-12T00:00:47+5:302019-09-12T00:03:04+5:30
अमळनेर येथील प्रकार

महिलेवर अत्याचारप्रकरणी तरुणावर गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
अमळनेर : विधवा व मागासवर्गीय महिलेवर अत्याचार करणाऱ्या तरुणाविरुद्ध अट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कुंदन प्रदीप पाटील याने येथील गुरुकृपा कॉलनीतील महिलेच्या मोबाईल नंबरवर सप्टेंबर २०१८ नंतर एक दिवस फोन करून तुझी मुलगी माझ्या घरी आली आहे, असे सांगून बोलावले. तिचा हात धरून बळजबरी ने तिच्यावर अत्याचार केला. त्यांनतर तो नेहमी तिला घरी बोलावायचा. तिने नकार दिल्यास मुलाबाळांना मारण्याची धमकी देत असे. ८ सप्टेंबर रोजी कुंदनने महिलेच्या घरी तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. तसेच मारहाण करून जातीवाचक शिव्या दिल्या. कुंदन सदल महिलेस वारंवार फोन करून तिच्यावर अत्याचार करून तिला धमकावत होता.
महिलेच्या फिर्यादीवरून कुंदन विरुद्ध बलात्कार तसेच अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. तपास डीवायएसपी राजेंद्र ससाणे करीत आहेत.