उन्मेष पाटील यांच्या वडिलांविरुध्द गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 12:25 IST2019-04-22T12:23:40+5:302019-04-22T12:25:07+5:30

सोशल मीडियावर धमकी व बदनामी

Crime against Unnaish Patil's father | उन्मेष पाटील यांच्या वडिलांविरुध्द गुन्हा

उन्मेष पाटील यांच्या वडिलांविरुध्द गुन्हा

चाळीसगाव: भाजप किसान मोर्चा प्रदेश सरचिटणीस कैलास सुर्यवंशी यांना सोशल मिडीयावरुन धमकी व बदनामीकारक मजकूर प्रसिध्द केला म्हणून आमदार उन्मेष पाटील यांचे वडील भैय्यासाहेब बाजीराव पाटील यांचे विरुध्द चाळीसगाव शहर पोलिसात २१ रोजी रात्री गुन्हा दाखल झाला आहे.
२० रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्या दरम्यान ‘भाजपा कट्टर ग्रुप धामणगाव’ या सोशल मिडीयाच्या ग्रुपवर भैय्यासाहेब पाटील यांनी कैलास सुर्यवंशी यांना उद्देशून बदनामीकारक व धमकी बाबत मजकूर टाकला. दरम्यान, विरोधात प्रचार करीत असल्याचा समज झाल्याने त्यातूनच धमकी दिली.

Web Title: Crime against Unnaish Patil's father

टॅग्स :Jalgaonजळगाव