सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:16 IST2021-04-09T04:16:43+5:302021-04-09T04:16:43+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या सात जणांविरुद्ध सायबर ...

सोशल मीडियावर अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : फेसबुक व इन्स्टाग्राम या सोशल मीडिया साइटवर अश्लील फोटो व्हायरल करणाऱ्या सात जणांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यातील तीन नावे महिलांची आहेत.
सोशल मीडियावर अश्लील फोटो, व्हिडीओ व्हायरल करण्यास फेसबुकने बंदी घातलेली आहे, असे असतानाही फेसबुकवर अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर फेसबुकने महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार करून संशयितांची नावे व लोकेशन कळविले. त्यानुसार महाराष्ट्र सायबरने राज्यातील अकाउंटधारकांची नावे निष्पन्न करून त्या त्या जिल्ह्याला कळविली. जळगाव जिल्ह्यात हे फोटो शेअर करणाऱ्यांविरुद्ध सायबर पोलीस ठाण्याचे कर्मचारी सचिन रमेश सोनवणे यांनी फिर्याद दिली. त्यावरून गुरुवारी सौरभ संजय वाणी, अतुल व्यास, राॅकी पाटील, रेवती ठाकूर, सोनाली इंगळे व रक्षा सेठी या सात जणांविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन नावे महिलांची आहेत. पोलीस निरीक्षक याचा तपास करीत आहेत.
पत्ते निष्पन्न करून संशयितांना अटक करणार
महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सात जणांची नावे पाठवली आहेत. या खातेदारांची माहिती फेसबुककडे पाठवली जाईल. त्यांच्याकडील मोबाइल व निवासाचा पत्ता घेतल्यानंतर संबंधित व्यक्तींना अटक करून न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक बळीराम हिरे यांनी ‘लोकमत’ला दिली.