तरुणीवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2019 23:49 IST2019-02-06T23:49:23+5:302019-02-06T23:49:55+5:30

गुन्हा दाखल होताच गावातून फरार

 The crime against the accused in the case of the girl | तरुणीवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा

तरुणीवर अत्याचारप्रकरणी दोघांवर गुन्हा

जामनेर : तालुक्यातील देवपिंप्री येथील २२ वर्षीय तरुणीवर अत्याचार प्रकरणात पोलिसांनी याच गावातील दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. दोघेही संशयीत आरोपी गुन्हा दाखल होताच गावातून फरार झाले आहेत.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, देवपिंप्री येथील पीडित तरुणी मंगळवार, ५ रोजी रात्री दहा वाजता शौचास जात असताना दोघांनी तिचा विनयभंग केला व ग्रामपंचायतीच्या गावठाण जागेत संजय पाटील याने तिच्यावर अत्याचार केला. गोपाल युवराज कोळी हा कुणी येत आहे का याबाबत लक्ष ठेवत होता. घटनेची माहिती पीडितेने बुधवारी कुटुंबीयांना सांगितली. त्यांनी बुधवारी फिर्याद दिली. संशयित आरोपी संजय पाटील व गोपाळ कोळी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विकास पाटील करीत आहेत.

Web Title:  The crime against the accused in the case of the girl

टॅग्स :Jalgaonजळगाव