पहूर येथील रिकामटेकड्या ११ जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2020 16:29 IST2020-04-01T16:27:55+5:302020-04-01T16:29:38+5:30

जमावबंदी, संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून रिकामटेकडे फिरणाºया ११ जणांविरूद्ध पहूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत.

Crime against 5 persons in Pagur | पहूर येथील रिकामटेकड्या ११ जणांविरुद्ध गुन्हा

पहूर येथील रिकामटेकड्या ११ जणांविरुद्ध गुन्हा

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांंच्या आदेशाचे उंल्लघनयापुढे मोहीम तीव्र करणार

पहूर, ता.जामनेर, जि.जळगाव : जमावबंदी, संचारबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून रिकामटेकडे फिरणाºया ११ जणांविरूद्ध पहूर पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. ही कारवाई तीव्र करण्यात येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व जमावबंदी आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले आहेत. असे असताना काही रिकामटेकडे लोक बसस्थानक परीसरात फिरताना आढळले आहे. यात अशोक धोंडू कुमावत रा.संतोषीमाता नगर, अनंता गजानन कुयटे, मनोज गजानन कुयटे, प्रभाकर रामदास बारी, रा.पेठ, राहुल दत्तू बोरसे, भगवान शंकर बोरसे, शेख इस्माईल शेख युसुफ रा.कसबे, बापू देवचंद पाटील, विनोद विकास वाणी रा.पाळधी व सलीम खाँ करीम खाँ रा.फर्दापूर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुचाकी घेऊन फिरणाºया रिकामटेकड्यांविरूध्द कडक कारवाई करण्यात येऊन वाहन जप्त करण्यात येणार असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी यांनी दिलीे.

Web Title: Crime against 5 persons in Pagur