आव्हाणे दंगलप्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2017 16:51 IST2017-06-05T16:30:36+5:302017-06-05T16:51:28+5:30

आव्हाणे येथील रविवारच्या दंगलप्रकरणी दोन्ही गटाच्या 16 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Crime against 16 people accused of rioting | आव्हाणे दंगलप्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा

आव्हाणे दंगलप्रकरणी 16 जणांविरुद्ध गुन्हा

ऑनलाईन लोकमत

जळगाव,दि.5- तालुक्यातील आव्हाणे येथील रविवारच्या दंगलप्रकरणी दोन्ही गटाच्या 16 जणांविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहे. सात जणांना अटक करण्यात आली आहे. 
पहिल्या गटातर्फे जोगेंद्र अरुण साळुंखे यांच्या फिर्यादीवरुन अमोल गोकुळ पाटील, देवेंद्र दत्तू पाटील, गोकुळ तुळशीराम पाटील, प्रल्हाद तुळशीराम पाटील, दत्तू तुळशीराम पाटील व प्रदीप उर्फ बापु प्रल्हाद पाटील यांच्याविरुध्द अॅट्रासिटी व मारहाणीचा गुन्हा दाखल झाला. गोकुळ पाटील वगळता सर्वाना अटक झाली आहे.
दुस:या गटातील दत्तू तुळशीराम पाटील यांच्या फिर्यादीवरुन बंटी उर्फ जोगेंद्र साळुंखे, उमेश जगन सपकाळे, शिलाबाई अरुण साळुंखे, अरुण गोविंदा साळुंखे, संजू चिंतामण सपकाळे, प्रकाश अशोक सुरवाडे, सुनील पानाचंद भालेराव, संजय भिका सपकाळे, आनंदा बळीराम सपकाळे व राजेंद्र कालिदास सोनवणे यांच्याविरुध्द घरात घुसून मारहाण व दागिने तसेच रोकड लुटून नेल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यात उमेश फरार आहे.

Web Title: Crime against 16 people accused of rioting